प्रदीपराव देशमुख यांची भाजपच्या उत्तर जिल्हा सचिव पदी निवड






 प्रदीपराव देशमुख यांची भाजपच्या उत्तर जिल्हा सचिव पदी निवड
पनवेल दि.१८(संजय कदम): नुकतीच भा ज पा रायगड जिल्हा कार्यकारिणीची मोठ्या उत्साहात रामशेठ ठाकूर प्रतिष्ठान, पनवेल येथे बैठक संपन्न झाली. याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, प्रभारी मावळ लोकसभा मतदार संघ, जिल्हाध्यक्ष, अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस, नितीन पाटील, पदवीधर मतदार संघाचे आमदार, निरंजन डावखरे, जिल्हा सरचिटणीस, अधिवक्ता प्रकाश बिनदार, माजी नगराध्यक्ष व महापौर चारुशीला घरत, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमल, जिल्हाउपाध्यक्ष, सुभाष कदम आदी मान्यवर उपस्थित होते.




      याप्रसंगी सर्वांना परिचित असलेले व मनमिळाऊ भा ज पा चे धडाडीचे कार्यकर्ते प्रदीपराव देशमुख यांची जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी उत्तर जिल्हा सचिव पदी निवड केली. प्रदीपराव देशमुख यांची सचिव पदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत असून कार्यकर्त्या मध्ये उत्साह संचारला आहे. प्रदीपराव देशमुख हे मनमिळाऊ स्वभावाचे असून त्यांना गरजुंना अधिक मदत करणे हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे. तसेच त्यांच्या कडे उत्कृष्ट संवाद कौशल्य असल्यामुळे ते कोणालाही आपली बाजू पटवून देतात व त्यामुळेच त्यांच्या कडे समाज अधिक आकृष्ट होत असल्याचे आढळून आले आहे.




 त्यांचा जनसंपर्क अगदी दांडगा आहे व त्यांच्या ह्या विविधरंगी गुणांमुळे त्यांची सचिव पदी निवड झाली आहे. त्यांनी ह्या अगोदर भा ज पा युवा मोर्चा अध्यक्ष, भा ज पा युवा मोर्चा रायगड जिल्हा सरचिटणीस, भा ज पा पनवेल शहर सरचिटणीस, पनवेल नगरपालिका शिक्षण मंडळ सदस्य, तुळजाभवानी सहकारी पतपेढी संचालक आदी महत्वपूर्ण पदांवर जबाबदारी निभावली आहे. प्रदीपराव देशमुख यांची सचिवपदी निवड झाल्याबद्दल भा ज पा प्रदेश कार्यकारणी सदस्य, बाळासाहेब पाटील, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश विक्रांत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, माजी तालुकाध्यक्ष तानाजी खंडागळे, देविदास खेडकर, समीर कदम, अरविंद मोरे, अविनाश भाकरे, मीनाक्षी भाकरे आदींनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


थोडे नवीन जरा जुने