पायाने पीठ मळून पुऱ्या बनवणारा कारखाना हद्दपार करा
पनवेल तालुक्यातील कामोठे येथे पाणीपुरीच्या पुरी बनविण्याच्या कारखान्यात पायाने पीठ मळत असल्याची व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी पाणीपुरीच्या आस्वाद घेणे सोडले असले तरी अशा गचाळ वातावरणात पुरी बनवणे मात्र कारखाना चालक - मालकांनी सोडले नसल्याने आजही अशाच प्रकारे पाणीपुरी अनेक ठिकाणी वितरित केले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणीपुरी म्हणजे चटपटी तोंडाला पाणी सुटणारे महिलांची खास पसंदी असते आणि सकाळी संध्याकाळी नाश्ता म्हणून किंवा भाजी खरेदीसाठी जाणाऱ्या महिला लहान मुले व सर्वसामान्यांच्या देखील आवडीचा पदार्थ आहे
पनवेल महापालिका हद्दीतील मधील कामोठे गाव सेक्टर ११ या ठिकाणी या पुऱ्या बनवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात खुलेआम पायाने तुडवत असलेली व आजूबाजूला घाण व अर्धवट वस्त्र घालून घाम गळत असलेल्या व्यक्ती पायाने पुऱ्याचे पीठ तुडवत असून अशा प्रकारे पुरीचे उत्पादन होत आहे व त्याची विक्री संपूर्ण पनवेल तालुक्यामध् केली जात ये आहे. तरी अन्न व औषध प्रशासन विभाग रायगड यांनी याबाबत कडक कारवाई करावी व पुरी बनवणाऱ्या या कारखाना मालकावर व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून सदरचा पुरी बनवण्याचा कारखाना कायमचा सील करून तो कामोठे शहरातून हद्दद्पार करावा अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्याकडे पत्राद्वारे केली आ


थोडे नवीन जरा जुने