श्री गणेश विसर्जन करण्याकरिता पनवेलकरांकडून पैसे आकारू नये व पैसे मागणाऱ्या संस्था अथवा खाजगी इसम यांच्यावर कारवाई करावी
पनवेल / प्रतिनिधी
   आगामी गणेशोत्सव सण काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. पनवेल महानगरपालिकेने देखील विविध पर्यावरण विषयक स्पर्धा ठेवलेल्या आहेत. पनवेल महानगर पालिका हद्दीतील तलावांमध्ये दीड दिवस, पाच दिवस, दहा दिवस तसेच गौरा - गणेशोस्तव दीड दिवस असलेल्या बाप्पांचे विसर्जन मोठ्या प्रमाणात होत असते. याठिकाणी विविध संस्था व स्वयंसेवक हे गणपती विसर्जन करण्यासाठी सज्ज असतात. काही नागरिक स्वतः स्वतःच्या बाप्पाचे विसर्जन करत असले तरी महापालिकेतर्फे त्यावेळी तलावात उतरण्यास बंदी असते.


 तरी अशा ठिकाणी विसर्जन करणाऱ्या संस्था अथवा खाजगी इसम यांना महापालिका देखील सन्मानाने मानधन देत असते मात्र त्यानंतरही नागरिकांकडून प्रत्येक गणपती अंदाजे १०० ते २०० रुपये विसर्जनस्थळी नागरिकांकडून वसूल केले जातात तरी अशा वसुली करणाऱ्या स्वयंसेवक अथवा संस्थेच्या कार्यकर्त्यांवर महापालिका आयुक्त यांनी कारवाई करावी व पनवेलच्या जनतेला मोफत गणेश विसर्जन करून द्यावे अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांनी पत्राद्वारे पनवेल महापालिका आयुक्तांकडे केली आहे. 


थोडे नवीन जरा जुने