दीपक फर्टिलायझर्सकडून जागतिक दर्जाच्या उत्सर्जन-नियंत्रण तंत्रज्ञानांचा वापर




पनवेल(प्रतिनिधी) भारताच्या काही अग्रगण्य खतनिर्मिती कंपन्यांपैकी एक असलेल्या दीपक फर्टिलायझर्सने उत्सर्जनाचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी करणारे अनोखे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी इंक्रो एस ए या स्पेन येथील औद्योगिक अभियांत्रिकीच्या क्षेत्रात पायाभूत काम करणाऱ्या कंपनीशी सहयोग साधला आहे.

      खतनिर्मिती उद्योगक्षेत्र हा भारतीय लोकसंख्येतील जवळ-जवळ ५५ टक्‍के लोकांचा मुख्य व्यवसाय असलेल्या कृषीक्षेत्राचा प्रमुख आधारस्तंभ राहिलेला आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. भारतातील खतनिर्मिती उत्पादक, पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पोषण पुरवत आणि धरणीमातेला अधिक कसदार बनवत शेतकऱ्यांना पाठबळ पुरवत आहेत व त्यायोगे देशाच्या कृषीक्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.


 मात्र एकीकडे उत्तम दर्जाची खते निर्माण करणे व त्याचवेळी उत्सर्जनाचे प्रमाणही नियंत्रणात ठेवणे यातील सुवर्णमध्य गाठण्यातील दुविधेचा सामना हे उत्पादक सातत्याने करत असतात. खतउत्पादनामध्ये अमोनियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातोव त्याचवेळी या प्रक्रियेदरम्यान उत्पादनाच्या साठ्यातून अमोनियाचे उत्सर्जनही होत असते. या घडत जाणाऱ्या प्रक्रियेमुळे आपल्या उत्पादन केंद्रामधून उत्सर्जनाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी खत उत्पादकांना सातत्याने आणि सक्रियपणे कष्ट घ्यावे लागतात. खतवापराच्या बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आपल्या देशात असे उत्सर्जन नियंत्रणात ठेवणे हे एक मोठेच आव्हान आहे. 


     देशांतर्गत खतनिर्मिती आणि खतवापराचे लक्षणीय प्रमाण लक्षात घेता उत्सर्जनाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आणि असे उत्सर्जन टाळण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान उपाययोजनेची गरज आहे, जी या गंभीर समस्येवर मात करू शकते. शाश्वत कृषी पद्धती वापरल्या जाव्यात याची खबरदारी घेण्यासोबतच खतनिर्मिती प्रक्रियांचा पर्यावरणावर कमीत-कमी परिणाम व्हावा या उदात्त हेतूने काम करत दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडने उत्सर्जनाचे प्रमाण किमान पातळीपर्यंत कमी करण्याची क्षमता असलेल्या एका आगळ्यावेगळ्या तंत्रज्ञानाचा पाया रचला आहे. या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे आता खतनिर्मिती केंद्रांच्या धुरांड्यांमधून होणाऱ्या अमोनियाच्या उत्सर्जनामध्ये<५० mg/Nm3, म्हणजे भारतीय नियमनांमध्ये सांगितल्या गेलेल्या उत्सर्गाच्या प्रमाणापेक्षा तीनपट घट होत आहे. २०१७ साली तयार करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानातील प्रक्रियेच्या स्वरूपामुळे ९९.५ टक्‍के ते ९९.९ टक्‍के अमोनिया पुन्हा निर्मितीप्रक्रियेत समाविष्ट होईल तसेच झीरो लिक्विड डिस्चार्ज अर्थात झेडएलडीचे उद्दीष्टही साध्य होईल याची काळजी घेतली जाते, जे एक लक्षणीय यश आहे. 


थोडे नवीन जरा जुने