पनवेल ओरियन मॉलच्या वतीने मोदक स्पर्धा थाटात संपन्न



भारतीय संस्कृती जपण्याचे व जोपासण्याचे काम ओरियन मॉल सातत्याने करीत आहे - अभिनेत्री भार्गवी चिरमुळे
पनवेल दि.२५ (संजय कदम) : भारतीय संस्कृती जपण्याचे व जोपासण्याचे काम ओरियन मॉल सातत्याने करीत आहे असे मत अभिनेत्री भार्गवी चिरमुळे यांनी पनवेल येथे ओरियन मॉलच्या वतीने आयोजित मोदक स्पर्धेत केले. पनवेल मधील ओरियन मॉल मध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मोदक मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उदघाटनाला प्रमुख पाहुण्या म्हणुन प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुळे या उपस्थित होत्या.


    गणेशोत्सव म्हटले कि महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठीच बाप्पाचा आवडता असलेले मोदक बनविण्याची आगळी वेगळी स्पर्धा ओरियन मॉलने आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रमुख तीन विजेत्यांना अभिनेत्री भार्गवी चिरमुळे यांच्या हस्ते आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये प्रथम पारितोषिक गीता नार्वेकर, द्वितीय पारितोषिक लीना माळी व तृतीय पारितोषिक रितिका बर्वे यांना देण्यात आले. 


एकूण ७० हुन अधिक महिलांसह पुरुषांनी देखील या मोदक स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स[स्पर्धेत परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध शेफ सुधाकर, हशिदा व रश्मी मोरे यांनी काम पहिले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध युवा मालिका अभिनेते सागर चव्हाण यांनी केले. दरवर्षी हि स्पर्धा आयोजित करून महिला वर्गातील सुप्त कलागुणाना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हि स्पर्श ओरियन मॉल आयोजित करीत असतो. या वेळी ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर आणि मनन परुळेकर उपस्थित होते.  




थोडे नवीन जरा जुने