रोख रक्कमेसह प्रत्येक सहभागी गणेशभक्तांना व सन्मानचिन्ह प्रमाणपत्र
उरण दि २०(विठ्ठल ममताबादे )मावळ लोकसभा मतदार संघाच्या भावी खासदार व माधवीताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठान रायगड यांच्यावतीने अनेक सामाजिक,शैक्षणिक , कला क्रीडा अश्या अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यंदा प्रथमच गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने मावळ लोकसभा मतदार संघात आरती संग्रहाचे वाटप व पूजनाचे किट असे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गणेशोत्सवात तसेच गणेश भक्तांना प्रोत्साहित करण्यासाठी सौ.माधवीताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत रोख रक्कम व सहभागी गणेश भक्तांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. गणेशभक्तांनी सजावटीचे ३ फोटो 83087 49002 या नंबर वर व्हॉट्सॲप करावे
. तर प्रत्येक पनवेल,उरण, कर्जत खालापूर, पिंपरी,चिंचवड, मावळ ह्या सहा विधानसभा मतदार संघासाठी रोख रक्कम असणार आहे. गणेश भक्तांचा उत्साह वाढविण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा भावी खासदार माधवीताई जोशी यांनी दिली आहे.सदर स्पर्धेत भाग घेणाऱ्या गणेशभक्तांना प्रथम पारितोषिक : रोख रक्कम २६९०९/- सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक : रोख रक्कम २२९०९/- सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक रोख रक्कम ११९०९/- सन्मानचिन्ह तसेच सहभागी गणेश भक्तांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात येणार आहे. तरी सर्व मावळ मतदार संघातील गणेश भक्तांनी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.
Tags
उरण