पनवेल महापालिका परिसरातील उपनगरांमधील ६५ टक्के मालमत्ताधारकांनी अजूनही थकीत कर भरलेला नाही. ही रक्कम १६०० कोटी रुपयांच्यावर आहे. भाजपाने पालिकेच्या सभागृहात एकहाती सत्ता असताना मालमत्ता करात ३० टक्क्यांची कपात केली होती. मात्र सिडको व पालिकेच्या दुहेरी करातून सवलत मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली होती. पालिका क्षेत्रातील उपनगरांमधील करदात्यांना लागू केलेला कर अजून कमी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह करणार असल्याची माहिती भाजप नेते परेश ठाकूर यांनी दिली.
Tags
पनवेल