शीर्षक नाही







जे. एन. पी. ए. मध्ये विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी.



उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )भारतीय मजदूर संघातर्फे विश्वकर्मा जयंती दिवस हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून जे. एन. पी. टी. जनरल कामगार संघटना व जे. एन. पी. टी. वर्कर्स युनीयन तर्फे विश्वकर्मा जयंती निमित्ताने कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 



कंत्राटी कामगारांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळवून देतानाच, जे कामगार या मूलभूत अधिकारांपासून वंचित आहेत अशा असंघटित कामगारांना संघटित करून त्यांनासुद्धा त्यांचे हक्क मिळावेत याकरीता प्रयत्नशील रहावे लागेल. जेव्हा शेवटच्या घटकाला त्याचे मूलभूत अधिकार प्राप्त होतील तेव्हाच समृद्ध राष्ट्र निर्माण होईल असे विचार भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघ चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष कामगार नेते सुधीर घरत यांनी कामगार मेळाव्यात व्यक्त केले.



यावेळी व्यासपीठावर भारतीय पोर्ट व डॉक मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील, जे.एन. पपई. ये. विश्वस्त रवींद्र पाटील, जनार्दन बंद, मधुकर पाटील, अनिल चिर्लेकर, मंजुळा म्हात्रे उपस्थित होते.



 कामगार नेते सुरेश पाटील व रवींद्र पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. सारा परिसर हाती घेतलेल्या झेंड्यानी भगवामय झाला होता. शोभायात्रेने मेळाव्याची सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्येने कामगारवर्ग उपस्थित होता.


थोडे नवीन जरा जुने