पनवेल(प्रतिनिधी) आपण जे काम करतो त्याची नोंद कुठेना कुठे तरी झालेली असते. त्यामुळे तुमच्या नाट्यक्षेत्रातील कामाची नोंद होईल आणि तुम्ही भावी काळात कलाकार व्हाल याची खात्री वाटते, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी एकपात्री, द्विपात्री अभिनय स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभावेळी केले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते १० व्या अटल करंडक स्पर्धेच्या चषकाचे अनावरण आणि स्पर्धेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या.
कलाकारांच्या अभिनयाची कसोटी पाहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा पुरस्कृत भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगडच्या वतीने एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. २७) झाला. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या ही स्पर्धा खुला आणि शालेय या दोन गटात झाली. यामध्ये खुल्या गटातील एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रतिकेश मोरे प्रथम, उमेश वाळके द्वितीय, श्रद्धा सावंत तृतीय, राहूल तायडे आणि वैष्णव पाटील यांना उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.
एकपात्री शालेय गटात अनन्या पिंगळे हीने प्रथम, कृपा गायकवाड द्वितीय, संस्कृती शिंदे तृतीय, ओवी मोघे आणि तनिष्का आपणकर यांना उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. द्विपात्री शालेय गटात प्रचिती र्शिके-अक्षरा पाटील यांनी प्रथम, कृपा गायकवाड-तेजस कुंभार यांनी द्वितीय, सिद्धी पार्टे-सृष्टी यादव यांनी तृतीय, दिपश्री न्हावकर-वैष्णवी शिंदे आणि देवांग पाटील-सिद्धर्थ सावंत यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले. द्विपात्री खुल्या गटात अभिराज भोसले-गार्गी घेगडमोल प्रथम, अमिषा पवार-वैशाली सवने यांनी द्वितीय, अक्षता साळवी-प्रणाली बोराळे यांनी तृतीय तर प्रतिकेश मोरे-उमेश वाळके आणि ऋतुजा भगत-बालाजी माने यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. या सर्व विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेवेळी १० व्या अटल करंडक स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या. त्यानुसार ही स्पर्धा ८, ९ आणि १० डिसेंबरला होणार असून पावनखिंड या सिनेमामध्ये नरवीर शिवा काशीदची भूमिका बजावणारे तसेच सीकेटी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अजिंक्य ननावरे हे यंदाच्या स्पर्धेचे ब्रँड अॅम्बेसिडर असणार आहेत.
या वेळी ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, महापलिकेच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, उद्योजक विलास कोठारी, विनोदी अभिनेता अंकित म्हात्रे, चला हवा येऊ द्या फेम संदीप रेडकर, शामनाथ पुंडे, सांस्कृतिक सेलचे अभिषेक पटवर्धन, गणेश जगताप, अमोल खैर, चिन्मय समेळ, वैभव बुवा, निखिल गोरे आदी उपस्थित होते.
Tags
पनवेल