आगामी गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर पनवेल महानगरपालिकेने बेवारस वाहनांवर कारवाई करण्याची मागणी






आगामी गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर पनवेल महानगरपालिकेने बेवारस वाहनांवर कारवाई करण्याची मागणी
पनवेल दि.०१(संजय कदम): रस्त्यांच्या कडेला बरेच महिने उभ्या असलेल्या जुन्या बेवारस वाहनांमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गणेशोत्सवकाळातही गणरायाच्या आगमन आणि विसर्जनावेळी ही वाहने अडथळा ठरतात. त्यावर कारवाई करावी, अशी मागणी पनवेलकरांनी पनवेल महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि वाहतूक पोलिसांकडे केली आहे.



पनवेल परिसरात अनेक ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने धूळखात महिनो महिने रस्त्यांच्या कडेला उभी असतात. त्यांचे मालक वर्षानुवर्षे पुढे येत नाहीत. त्यांच्यामुळे वाहतुकीला अडथळाही येतो. तसेच पाणी साचल्यामुळे डासांची पैदास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेकडून ही वाहने हटवण्यात येतात. त्यांच्या मालकी हक्कासाठी कुणी न आल्यास ती वाहने संबधित शासकीय खाते जप्त करतात. यापैकी बरीच वाहने ही क्रमांकांविना असतात. बेवारस वाहने पालिकेच्या वॉर्डस्तरावर कारवाई करून हटवण्यात येतात. मात्र त्याची संख्या कमी झालेली नाही.



 अद्याप पनवेलमधील बऱ्याच भागात बेवारस वाहने उभी आहेत. गणेशोत्सव मंडळांच्या जवळील रस्त्यांवर बेवारस वाहने बरीच असून या वाहनांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या वाहनांमुळे आगमन आणि विसर्जनाला अडथळे येतात. त्यामुळे अडथळे दूर करण्यासाठी पालिका आणि पोलिसांनी कारवाई राबवावी अशी मागणी सुद्धा करण्यात येत आहे.



थोडे नवीन जरा जुने