उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )आयओटीएल धुतुम येथील प्रकल्पग्रस्त कामगार गेली अनेक वर्ष बदली नवीन कामगारांच्या पगारासाठी लढा देत होते. अनेक संघटनांनी प्रयत्न केले परंतु व्यवस्थापन १२००० रुपये किमान वेतनाच्या वर जायला तयार नव्हते. शेवटी या स्थानिक कामगारांनी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्विकारले व स्थानिक प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची विनंती केली असता
आपल्या नेतृत्वकौशल्याने दोन महिन्यातच १२००० वरून २१००० हजार रुपये वाढ किमान वेतन म्हणजेच तब्बल ९००० रुपये नवीन बदली कामगारांना मिळवून देण्यात ते यशस्वी झाले. त्याचबरोबर जुन्या कामगारांप्रमाणे मिळणारी पगारवाढ सुद्धा या कामगारांना मिळणार आहे आणि त्याची अंमलबजावणी ऑगस्ट महिन्याच्या पगारापासून झाली सुद्धा. अनेक वर्षानंतर मिळालेल्या घसघसीत पगारवाढीमुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कामगारांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कामगार नेते महेंद्र घरत यांची भेट घेवून त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी कामगारांतर्फे गजानन ठाकूर, जगदीश घरत, जितेंद्र पाटील, प्रितम घरत, प्रणित ठाकूर, वृषभ पाटील, प्रविण पाटील, श्रिधर ठाकूर, राम घरत आदि उपस्थित होते.
Tags
उरण