शिवसेना उरण उपतालुका संघटिका मनीषा नितीन ठाकूर यांची पालघर जिल्हा वक्ता म्हणून नियुक्ती


शिवसेना उरण उपतालुका संघटिका मनीषा नितीन ठाकूर यांची 'पालघर जिल्हा वक्ता' म्हणून नियुक्ती


नियुक्ती झाल्यानंतर मनीषा ठाकूर यांनी घेतले माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे आशीर्वाद
उरण दि 13(विठ्ठल ममताबादे )
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याच्या महिला आघाडीच्या उपतालुका संघटिका मनीषा नितीन ठाकूर यांची पालघर जिल्ह्याच्या सहा विधानसभा क्षेत्रासाठी 'जिल्हा निहाय्य वक्ता' या पदावर नियुक्ती करून त्यांच्याकडे पालघर जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.शिवसेना प्रवक्ते अनिस गाढवे यांच्या सूचनेनुसार शिवसेना भवन मधून ही नियुक्ती होताच उरण उपतालुका संघटिका मनीषा नितीन ठाकूर यांनी शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी मनीषा नितीन ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे व शिवसेना पक्षातील त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


थोडे नवीन जरा जुने