सनद पॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी शेतकरी प्रबोधिनी संस्थेतर्फे नायब तहसीलदार सुनील जाधव यांना निवेदन.






सनद पॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी शेतकरी प्रबोधिनी संस्थेतर्फे नायब तहसीलदार सुनील जाधव यांना निवेदन.



 उरण दि. 14 ( विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील बालई काळाधोंडा गावठाण हद्दीत अनेक नागरिक गेली अनेक वर्षे राहत आहेत.नागरिकांच्या या राहत्या घरास सनद प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी तात्काळ स्थळ पंचनामा करून सातबारा सदरी नोंद करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांच्या,गोरगरिबांच्या कष्टकरांच्या न्याय हक्कासाठी लढणा-या शेतकरी प्रबोधिनी या सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सुनील जाधव, नायब तहसीलदार उप विभागीय अधिकारी कार्यालय पनवेल यांची भेट घेउन त्यांना निवेदन दिले. 




बालई काळाधोंडा गावठाण हद्दीतील नागरिकांना सनद प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी तात्काळ स्थळ पंचनामा करून सातबारा सदरी नोंद करण्यात यावी अशी मागणी शेतकरी प्रबोधिनी या संस्थेच्या वतीने यांना पत्रव्यवहाराद्वारे (निवेदनाद्वारे) करण्यात आली.यावेळी शेतकरी प्रबोधिनी या संस्थेचे अध्यक्ष राजाराम पाटील , बालई काळा धोंडा ग्रामविकास परिषदेचे सचिव रविंद्र चव्हाण, खजिनदार- नितिन चव्हाण,सहखजिनदार मधुकर भोंबले,सहसचिव- राहुल चव्हाण,सदस्य -जितेंद्र चव्हाण,ग्रामस्थ -सूजित शिरढोणकर, अविनाश भोईर , परेश चव्हाण, नामदेव म्हात्रे, परेश चव्हाण, आत्मेश पवार, आनंद जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.




 यावेळी नायब तहसीलदार सुनील जाधव यांनी शेतकऱ्यांची , ग्रामस्थांची समस्या समजावून घेत सदर समस्या वरिष्ठापर्यंत पोहोचवून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.शेतकऱ्यांच्या तसेच स्थानिक मूळ भूमीपुत्रांच्या प्रॉपर्टी हक्काचा प्रश्न शेतकरी प्रबोधिनी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शासन दरबारी मार्गी लागणार आहे. गावठाण हद्दीतील सर्व नागरिकांना, जनतेला त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी शेतकरी प्रबोधिनी या संस्थेने पुढाकार घेतला आहे. आणि त्याला शासन स्तरावर यश सुद्धा मिळताना दिसत आहे.त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र यावे असे आवाहन बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेचे सचिव रविंद्र चव्हाण यांनी सर्व नागरिकांना केले आहे.


थोडे नवीन जरा जुने