पनवेल मधील तलाव, विहिरी व बोअरवेल मधील पाणी, पाणी टंचाईच्या काळात पनवेलकरांच्या वापरासाठी विना शुल्क उपलब्ध करून देण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महानगरपालिकेकडे मागणी








पनवेल मधील तलाव, विहिरी व बोअरवेल मधील पाणी, पाणी टंचाईच्या काळात पनवेलकरांच्या
वापरासाठी विना शुल्क उपलब्ध करून देण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  महानगरपालिकेकडे मागणी
पनवेल दि. ०६ ( संजय कदम ) : पनवेल मधील तलाव, विहिरी व बोअरवेल मधील पाणी, पाणी टंचाईच्या काळात पनवेलकरांच्या वापरासाठी विना शुल्क उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे)तर्फे आज पनवेल महानगरपालिकेचे उप आयुक्त श्री विधाते यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.




      यावेळी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाचे पनवेल शहरप्रमुख प्रवीण जाधव , शहर संघटिका अर्चना कुलकर्णी ,शहर संघटक राकेश टेमघरे ,उपमहानगर संघटक अच्युत मनोरे ,उपशहर प्रमुख रोहित टेमघरे ,युवा सेना उत्तर रायगड जिल्हाधिकारी पराग मोहिते ,ग्राहक संरक्षण कक्ष तालुका संघटक कुणाल कुरघोडे ,विभागप्रमुख प्रशांत नरसाळे , उपशहर प्रमुख सुजन मुसलोंडकर ,मा. नगरसेवक विश्वास म्हात्रे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते . यावेळी बोलताना पनवेल शहरप्रमुख प्रवीण जाधव यांनी सांगितले की , पनवेल सारख्या महाराष्ट्रातील एका प्रमुख धुरा महाराष्ट्र शासनाने महानगरपालिकेच्या खांद्यावर दिली आहे. त्यांच्या प्रशासकीय कार्यशैलीचा पनवेलला प्रत्यक्ष प्रत्यय येवून पनवेल महानगरपालिका सर्वागीण दृष्ट्या अग्रेसर राहील, हे दिवास्वप्न पूर्ण होण्याची पनवेलकर वाट बघत



 आहेत.पनवेलकर अनेक वर्ष पाणीटंचाईच्या समस्येने प्रचंड त्रस्त आहेत. पनवेलच्या मागील काही वर्षातील सत्ताधाऱ्यांनी पाणी टंचाई समस्येचे निराकरण न करता पनवेलकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, तसेच त्यांना पनवेलच्या मालकीच्या एकमेव देहरंग धरणाचा गाळ काढून त्याचा सुद्धा पुरेपूर वापर अजूनही करता आलेला नाही. त्यामुळे पनवेलकरांना पालिका प्रशासन हेच आता आशा स्थान शिल्लक राहिले आहे. तरी तलावांचे शहर अशी पुरातन ओळख असलेल्या पनवेल मधील वडाळे तलाव, देवाळे तलाव,कृष्णाळे तलाव, लेंडाळे तलाव व विश्राळी तलाव तसेच विहिरी आणि बोअरवेल इत्यादि पाणसाठे, पाणी टंचाईच्या काळात त्वरित ताब्यात घेवून त्यातील पाण्यावर योग्य ती प्रक्रिया किंवा शुद्धिकरण प्रकल्प व इतर पाणी संवर्धन योजना असतील त्या इथे अंमलात आणाव्या आणि पाणी पनवेलकरांच्या वापरासाठी उपलब्ध करून द्यावे, त्यासाठी जो काही पाठपुरावा करण्याची आवश्यकता असेल ती करण्याची शिवसेनेची तयारी आहे.तलावांचे फक्त सुशोभीकरण करून चालणार नाही तर त्या तलावांना दुर्गंधी, केरकचरा व अतिक्रमण मुक्त करणे गरजेच आहे. तसेच पनवेल शहराला लवकरात लवकर या टॅकरमाफियांच्या विळख्यातून सुद्धामुक्त करायचे आहे.अशी मागणी करण्यात आली आहे . यानंतरही नमूद जटिल आणि पनवेलकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या समस्येचे जर निराकरण त्वरित झाले नाही तर आम्ही शिवसैनिक रस्त्यावर उतरू असा इशारा सुद्धा यावेळी पनवेल महानगरपालिकेचे उप आयुक्त श्री विधाते यांना देण्यात आला आहे.


थोडे नवीन जरा जुने