पनवेल दि. ०६ ( संजय कदम ) : माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या २७ व्या स्मृतिदिनानिमित्त पनवेल शिवसेना शहर शाखे तर्फे आज आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाचे पनवेल शहरप्रमुख प्रवीण जाधव , शहर संघटिका अर्चना कुलकर्णी , मा. नगरसेवक विश्वास म्हात्रे, मा. नगर सेवक अच्युत मनोरे, उप तालुका श्रीमती सुनंदा पाटील, उपशहर संघटक सौ. उज्ज्वला गावडे, उप शहर प्रमुख सुजन मुसलोंडकर, शहर संघटक राकेश टेमघरे, उपशहरप्रमुख रोहित टेमघरे, युवासेना उ. रायगड जिल्हाधिकारी पराग मोहिते, शाखा प्रमुख दत्तात्रय फडके, शाखा प्रमुख भास्कर पाटील, विभाग प्रमुख प्रशांत नरसाळे, शिवसैनिक शैलेश जगनाडे, शिवसैनिक अरुण ठाकूर, विजय शिंदे, मयुर दसवते, इ. उपस्थित होते.
Tags
पनवेल