पनवेल दि.२७(संजय कदम):मा नगरसेवक राजू सोनी यांनी आत्तापर्यंत समाजासाठी केलेले कार्य महत्वाचे असून त्यांच्या वाढिदवसानिमित्त शुभेच्छा देतात असेच समाजासाठी कार्य घडत राहो अश्या शुभेच्छा शिवसेना तालुका प्रमुख भरत जाधव यांनी त्यांना पुष्पगुच्छ देताना दिल्या आहेत.
मा. नगरसेवक राजू सोनी यांनी शंभर ते दीडशे वयोवृद्ध महिला व पुरुष यांचे फ्री मध्ये डोळ्याचे ऑपरेशन करून त्यांना नवीन दृष्टी दिली आहे. त्याच प्रमाणे संकटकाळी गोरगरिबांसाठी रात्री अपरात्री धावून जाणारे पनवेल महानगरपालिकेचे मा सभापती तसेच नगरसेवक राजू सोनी यांची ख्याती आहे. त्यामुळेच आज वाढदिवसानिमित्ताने आवर्जून त्यांची भेट घेऊन शुभेच्छा देत असल्याचे तालुका प्रमुख भारत जाधव यांनी यावेळी सांगितले.
Tags
पनवेल