दुर्गम भागातील बोंडार पाडा येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विविध वस्तूंचे पनवेल महापालिकेचे मा.नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आले वाटपदुर्गम भागातील बोंडार पाडा येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विविध वस्तूंचे पनवेल महापालिकेचे मा.नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आले वाटप
पनवेल दि.०१(संजय कदम): पनवेल येथील दुर्गम अशा बोंडार पाडा या गावातील रायगड जिल्हा परिषद मार्फत चालवण्यात येणाऱ्या शाळेमध्ये पहिली ते पाचवी इयत्ता मधील विद्यार्थ्यांना आणखी सोय सुविधा मिळाव्यात या सदिच्छाने पनवेल महापालीकेचे मा. नगरसेवक ऍड. मनोज भुजबळ यांच्या प्रयत्नातून तेथील मुख्याध्यापक विष्णू सपरा यांना संपर्क करून विद्यार्थ्यांसाठी विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.     यावेळी ऍडव्होकेट गजानन पाटील, सुनील तेलगे, दिलीप म्हात्रे, डॉक्टर शितल तेलगे, यांनी कै. काशिनाथ महादेव पाटील गुरुजी, कै. प्रेमलता नारायण तेलगे तथा कै. चिंतामण धर्माजी मात्रे यांच्या स्मरणार्थ लोखंडी मोठ्या रॅक दोन नग, अत्यावश्यक असलेले वॉटर फिल्टर (प्युरिफायर), पंखे चार नग, ट्यूबलाईट चार नग, प्लास्टिक बॉक्स 20 नग, विविध प्रकारच्या वह्या 150 नग, पेन्सिल रबर इत्यादी 30 नग तसेच खाद्यपदार्थ देण्यात आले. या वेळी ऍडव्होकेट सुनील तेलगे यांनी त्यांच्या आई कै. प्रेमलाता नारायण तेलगे यांच्या स्मरणार्थ सर्व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक तसेच इतर वस्तू नेण्यासाठी बॅग दिल्या.


 या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सदर वेळी शाळेचे मुख्याध्यापक विष्णू सपरा यांनी या वस्तू दिल्याबद्दल आभार मानले व मा. नगरसेवक मनोज भुजबळ यांनी सदर सामाजिक कार्यासाठी त्यांच्या शाळेची निवड केली याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी गजानन पाटील व ऍडव्होकेट सुनील तेलगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


थोडे नवीन जरा जुने