पनवेल तालुक्यातील अनेक ग्रामसेवकाविरुध्द गौरव जहागीरदार यांनी दाखल केले अपील, दि. 5 ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी.



पनवेल ; दि. ४ ऑक्टोबर (4K News) रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील सोमाटणे, चावणे, उलवा, वहाळ, कुंडे वहाळ, तरघर, गव्हाण च्या गावच्या ग्रामसेवकांनी ( जण माहिती अधिकारी) गौरव जहागीरदार यांच्या माहिती अधिकार २००५ अंतर्गत अर्जाला विहित मुदतीत उत्तर दिले नाही म्हणून गौरव जहागीरदार यांनी त्यांच्या विरुद्ध पंचायत समितीचे  विस्तार अधिकारी यांच्याकडे   प्रथम अपील  दाखल केले त्याची सुनावणी  दि. ५ ऑक्टोबर रोजी पनवेल येथील  पंचायत समिती कार्यालयात होणार आहे.


   
 चावणे ग्रामसेवकांची फक्त दोन रुपयासाठी अडवणूक.

 मु. चावणे, ता. पनवेल चावणे गावच्या हद्दीत एका  प्लॉटवर चालू असलेल्या इमारत बांधकामावर श्री गौरव  जहागीरदार यांनी माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत अर्ज केला व ग्रापंचायतिने या बांधकामाला कोण कोणती परवानगी दिली त्या बद्दल माहिती मागवली. त्या नंतर चावणे गावचे जण माहिती अधिकारी यांनी एक पानी पत्र पाठवून २ रुपये स्टेट बँकेत फी भरा व ती पावती दाखवा व  माहिती द्या असे पत्र पाठवले, 



दोन रुपये भरायला काहीच हरकत नाही परंतु भरण्यासाठी गौरव जहागीरदार अनेक स्टेट बँकेच्या शाखेत पावसात फिरले पण कुठेही अशी सोय नाही असे सांगितले. खर म्हणजे शासनाचे परिपत्रक सांगते की  परिपत्रक क्रमांक केमाअ -2008/प्र. क्र.93/8/सहा (मा. अ) स्पष्ट लिहिले आहे की माहितीचा अधिकार कायदा  अधिनियम २००५ अन्वये माहिती अधिका-यांनी ३० दिवसात अर्जदारास माहिती पुरविणे आवश्यक आहे. जर रक्कम किरकोळ रुपये २/३/४ असेल तर माहिती अधिकार कायदा अधिनियमातील कलम ७ (१) मधील किरकोळ  शुल्क मागविण्याची आवश्यकता नसून पहिल्याच पत्रोत्तरात माहिती पाठविणे शक्य आहे व त्यासाठी साधारण टपाल हशीलापेक्षा अधिक टपाल हशील लागत नाही तेथे सदर टपाल हशीलाचा खर्च अर्जदारांकडून घेणे योग्य नाही. 



हा नियम सांगतो तरी चावणे गावच्या जण माहिती अधिकाऱ्याने  गौरव जहागीरदार यांना त्रास व्हावा व वेळकाढूपणां केला त्यामुळे अर्जदाराला नाहक मानसिक त्रास झाला व वेळेत उत्तर नाही दिले म्हणून पनवेल येथील विस्तार  अधिकारी म्हणजेच प्रथम अपीलिय अधिकारी यांच्याकडे  प्रथम अपील दाखल केले. 


        सामान्य लोकांना भीती दाखविण्यासाठी  ग्रामपंचायत कार्यालयात बोर्ड लावला.

 मु. सोमाटणे ता. पनवेल. येथील ग्रामपंचायत  कार्यालयात   गौरव जहागीरदार काही कामानिमित्ताने गेले  असताना तिथे एक बोर्ड दिसला सरकारी कर्मचाऱ्यावर होणारे हल्ले व त्यावरील शिक्षा बोर्ड लावला होता. खरे म्हणजे असा बोर्ड लावणे कुठल्याही  शासकिय नियमात  बसत नाही किंव्हा आदेशही नाही. 
त्यामुळे त्या बोर्डाला पाहून  ग्रामपंचायत मधे  येणारे सर्वसामान्य लोक घाबरतात एक प्रकारे हा लोकांना भीती दाखवण्याचा प्रकार आहे. त्या साठी सोमाटणे जण माहिती अधिकाऱ्याकडे हा बोर्ड कोणत्या नियमात लावला कोणाच्या आदेशाने लावला ही माहिती मागवली. ते  पत्र पाठविल्यानंतर एक राजकीय पक्षांच्या  कार्यकर्त्याने एका कार्यक्रमात अनेक पत्रकारांसमोर अर्जदाराला म्हणजे गौरव जहागीरदार यांना धमकी दिली अर्ज मागे घ्या नाहीतर हे करू ते करू तरीही  तरीही न घाबरता गौरव जहागीरदार यांनी प्रयत्न चालू ठेवला तरीही विहित मुतदित  सोमाटणे  गावच्या ग्रामसेवकाकडून गौरव जहागीरदार  यांना उत्तर आले नाही म्हणून त्यांनी. पंचायत समितीचे  विस्तार  अधिकारी म्हणजेच प्रथम अपीलिय अधिकारी यांच्याकडे  प्रथम अपील दखल केले. 




  
ग्रामसेवकांनी आपल्या वरीष्ठ विस्तार अधिकारी यांचा आदेश नाही मानला.

पनवेल तालुक्यात अनेक गावे आहेत ज्या भागाचे शहरीकरण झाले आहे त्या अनेक गावात सिडको ने  अनेक बिल्डरांना टेंडर प्लॉट विकले आहेत त्या बिल्डर लोकांनी भली मोठी चकाचक ऑफिसेस थाटली आहेत तसेच वॉल कंपाऊंड वर भल्या मोठ्या व लांबलचक जाहिराती केल्या आहेत तो भाग ग्रामपंचायत हद्दीत येत असल्यामुळे त्यांनी केलेल्या जाहिरातबाजी वर ग्रामपंचायतसाठी उतपन्न  मिळण्याचा हकक आहे का ? त्यामुळे ग्रामपंचायतला महसुलात वाढ होऊ शकते, जर बिल्डरांनी जी जाहिरात केली त्यावर का जाहिरात कर वसूल का नाही केली  हे पत्र  गौरव जहागीरदार यांनी माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत विस्तार अधिकारी यांना पाठवले.



व विस्तार अधिकारी यांनी ते पत्र उलवा, वहाळ, कुंडे वहाळ, तरघर, गव्हाण ग्रामपंचायतींना पाठवले व ३० दिवसात उत्तर द्यायला सांगितले. परंतु ३० दिवसापेक्षा अनेक दिवस होऊन गेले तरी एकाही गावच्या जण माहिती अधिकाऱ्याने (ग्रामसेवकांनी )  त्याचे उत्तर दिले नाही की कसली दखल घेतली नाही एक प्रकारे त्यांनी आपले वरीष्ठ  म्हणजेच  विस्तार अधिकारी यांचाच आदेश नाही मानला. म्हणून त्या सर्वा विरुध्द पंचायत समितीचे प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे प्रथम अपील केले.



त्यामुळे पनवेल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी  यांनी गौरव जहागीरदार यांच्या अपिलावर वरील  सर्वांची प्रथम अपिलीय सुनावणी दिनांक ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते एक वेळेत पंचायत समिती कार्यालयात ठेवली आहे. व सर्वांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे. 







  
थोडे नवीन जरा जुने