उरण दि २५(विठ्ठल ममताबादे ) आज काल शहरीकरणाच्या आणि विकासाच्या नावाखाली गावच्या - गावं उध्वस्त केली जात आहेत आणि हे सर्व पाहता माझा गाव माझा अभिमान ! ही संकल्पना उराशी बाळगत आज पर्यंत उरण,पनवेल, पेण तालुक्यातील अनेक गावांना त्यांच्या गावांच्या नावांचे बोधचिन्ह अर्थात विद्युत रोषणाईने चमकणाऱ्या नावांचे नवीन नामफलक बनवून देण्याचं औदार्य ज्यांच्या मनाच्या मोठेपणातून साकारलं गेलं असे दानशूर व्यक्तिमत्त्व केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांच्या संकल्पनेतून आगरी, कोळी , कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्यातून उरण येथील डोंगरी गावात "आम्ही डोंगरीकर " या नावाचं विद्युत रोषणाईने चमकणारे नूतन नामफलक ( बोधचिन्ह ) बनऊन देण्यात आले व त्या नूतन नामफलकाचा अनावरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन डोंगरी या गावांत डोंगरी गावचे कर्तव्यदक्ष युवा सरपंच संकेतदादा घरत यांच्या आयोजनातून करण्यात आले.
डोंगरी गावची ग्रामदेवता आई अंबे मातेच्या मंदिरात भव्य यात्रेच्या उत्सव काळात डोंगरी गावचे कर्तव्यदक्ष युवा सरपंच संकेतदादा घरत आणि सर्व सहकारी मंडळी यांच्या वतीने मंदिराच्या भव्य अश्या सभामंडपात कार्यक्रमा करिता उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवर मंडळींचे जोरदार स्वागत करून सर्वांचा यथोचित मान - सन्मान करून सर्वांना सन्मानित करण्यात आले. उरण येथील डोंगरी ह्या गावांत नवीन नामफलकाच्या ( बोधचीन्हाच्या) अनावरण सोहळ्या प्रसंगी आमंत्रित प्रमुख मान्यवर अतिथी म्हणून उपस्थिती लाभली ती केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक,महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर,आगरी, कोळी , कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यचे कार्याध्यक्ष रोहनदादा पाटील,पनवेल तालुका अध्यक्ष प्रदीपदादा पाटील,डोंगरी गावचे सरपंच संकेतदादा घरत,केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष स्नेहल पालकर, आगरी, कोळी , कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे उरण तालुका सचिव अनिल घरत,कॉन संस्थेचे उपाध्यक्ष महेश पाटील वी
, कॉन संस्थेचे वेश्वी शाखा उपाध्यक्ष सुरेंद्र दादा पाटील,गोल्डन ज्युबली मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष नवनीत पाटील, मित्र परिवाराचे अध्यक्ष संपेश पाटील, खजिनदार क्रांती म्हात्रे,सारडे गावचे सामाजिक कार्यकर्ते राजेशजी पाटील, मित्र परिवाराचे युवा कार्यकर्ता कु.रचित म्हात्रे, मोहित पाटील आणि डोंगरी गावांतील ग्रामस्थ मंडळी सोबतच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत या विद्युत रोषणाईने चमकणाऱ्या नवीन नामफलकांचा अनावरण कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.
Tags
उरण