जय गोपीनाथ प्रतिष्ठान महाराष्ट्र जनसंपर्ककार्यालयाचे कामोठे येथे झाले उद्घाटन





जय गोपीनाथ प्रतिष्ठान महाराष्ट्र जनसंपर्ककार्यालयाचे कामोठे येथे झाले उद्घाटन
जय गोपीनाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचे कामोठे येथे शिवसेना पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे व भाजपा कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी भाजपाचे भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे मा.नगरसेवक प्रविण शेठ पाटील माजी सभापती, माजी नगरसेविका, सौ.पुष्पाताई कुत्तरवाडे, सहकार सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मा.अशोक मोटे , रायगड जिल्हा चिटणीस सौ विद्या तामखडे मा.सुनिल शिरसाट मा.काकासाहेब कुत्तरवाडे , समाजसेवक किरण गीते व अनेक वेगवेगळ्या परिसरातून अनेक संस्थेचे पदाधिकारी व लोक उपस्थित होते .




 संस्थेच्या वतीने काही नियुक्त्या करण्यात आल्या, रायगड जिल्हाध्यक्ष, किरण गित्ते, रायगड जिल्हा उपाध्यक्ष, तुकाराम केदार, संस्थेच्या उपाध्यक्ष पदी विनोद खेडकर, महिला उपाध्यक्षा मनिषाताई वनवे,यांच्या नियुक्ती वरील सर्व मान्यवरांच्या हास्ते करण्यात आल्या . सुरुवातीला संस्थेच्या विषयी बोलताना बबन मार्ग यांनी संस्थेच्या कामाचा आढावा मांडला व संस्थेच्या वतीने जी काही कामे केली त्याची विस्तृत माहिती सर्व मान्यवरांना दिली व या पुढील काळामध्ये वंचितांसाठी अनाथालय बांधण्याचा संकल्प संस्थेच्या वतीने सोडण्यात आला बबन बारगजे यांच्या भाषणात प्रतिउत्तर देताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी सांगितले की संस्थेचे कार्य खूप छान प्रमाणात चालू आहे तुम्हाला संस्थेसाठी जी काही मदत लागेल ते मी करण्यास तयार आहे





 त्याचप्रमाणे रघुनाथ पाटील यांनीही संस्थेच्या पाठीशी असल्याचे ठामपणे सांगितले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुभाष आंधळे सचिव हनुमंत विघ्ने खजिनदार संग्राम केंद्रे उपाध्यक्ष अनंत ठोंबरे पप्पू सोनवणे विठ्ठल घोळवे विनोद खेडकर सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी या सामाजिक कार्यास भरभरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल श्री हनुमंत विघ्ने यांनी सर्वांचे आभार मानले .



थोडे नवीन जरा जुने