रायगड सम्राट न्यूज जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेल घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार






रायगड सम्राट न्यूज जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेल घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार
पनवेल / प्रतिनिधी :-
रायगड सम्राट न्यूज आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने "घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२३" चा निकाल व परितोषक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार.
 राज्यस्तरीय घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेतया दुसऱ्या वर्षी शेकडो गणेश भक्तांनी सहभाग घेऊन बाप्पा साठी केलेल्या आरासाची माहिती पाठवली होती.
 त्यामध्ये ८६ स्पर्धकांची निवड केली गेली होती. 
यात ऑनलाईन पद्धतीने निकाल काढण्यात आला.
यात प्रथम पाच क्रमांकाचे आज दि ०८ ऑक्टोबर रोजी पनवेल येथे पारितोषिक वितरण करण्यात आले.


यामधील विजेते पुढील प्रमाणे 1)रानंद सातारा, शिवाजी शिंदे 
2) गोंदवले खुर्द सातारा, सौ प्राची तुषार पोळ
3)नांदगाव पनवेल, अशोक खुटले
4) कामोठे भरत माने
5) कामोठे सुरेश दादू मल्लव
 यांना श्री.प्रितमदादा म्हात्रे यांच्यासोबत रायगड सम्राट न्यूजचे श्री.शंकर वायदंडे यांनी पारितोषिक सन्मान चिन्ह सन्मान पत्र देऊन सन्मानीत केले तसेच द्वारकदास शाम कुमार पनवेल कडून विजेते महिला उत्तेजनार्थ पैठणीच्या मानकारी प्राची तुषार पोळ ठरलेल्या. तसेच सहभाग घेतलेले श्रीधर पाटील,विनायक गावडे दिनेश नाईक यांना ही सहभाग पत्र देण्यात आले.
परितोषक मिळवलेल्या गणेश भक्तांचे कुटुंबीयाचे आयोजक प्रितम म्हात्रे व शंकर वायदंडे यांनी आभार मानले.
यावेळी उपस्थित मान्यवर मंगेश अपराज,पत्रकार गणेश कोळी,पत्रकार संतोष आमले, पत्रकार आप्पासाहेब मगर पत्रकार सनीप कलोते, पत्रकार राजेंद्र कांबळे पत्रकार गणपत वरगडा पत्रकार राम बोरिले,पत्रकार सुरेश भोईर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुलदीप तांबे यांनी केले.


थोडे नवीन जरा जुने