पनवेल (प्रतिनिधी) पनवेलचे राजेश टाक हे उत्तम स्वीमर व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या सनी व संदिप या दोन्ही मुलांना चांगल्या संस्काराबरोबरच एक उत्तम स्वीमींगचे योग्य प्रशिक्षण दिल्याने दोन्ही मुलांनी आई वडीलांचे नाव सातासमुद्रापलीकडेही चांगला नावलौकीक मीळविल्याने त्यांचे सर्व स्थरातुन अभिनंदन होत आहे.
नुकताच युथ स्पोअर्ट डेव्हलपमेंन्ट फोरम आयोजीत रंगशाळा स्टेडीयम पोखरा नेपाळ येथे
नेपाळ इंन्टरनॅशल गेम्स चॅम्पीयन शीप सन 2023 चे आयोजन करण्यात आले होते या बहारदार कार्यक्रमास बांगलादेश,भुतान,श्रीलंका अशा विविध स्थरातुन अनेक मुले आपल्या स्कीलचे प्रात्यक्षीक दाखविण्या करीता सामील झाले होते या मध्ये पनवेलचा रहीवाशी असलेला सनी राजेश टाक यांनी 50 मी.ब्रेस्टस्ट्रोक व 50 मी.फ्री स्टाईल मध्ये दोन सुवर्ण पदके जिंकुन आणुन पनवेलचा नावलौकीक केल्याने सनी टाक वर विविध स्थरांतुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
Tags
पनवेल