बहुजन मुक्ती मोर्चाच्या अधिवेशनात भारत राष्ट्र समितीचा बोलबाला


बहुजन मुक्ती मोर्चाच्या अधिवेशनात भारत राष्ट्र समितीचा बोलबाला
पनवेल दि.०९(संजय कदम ): बहुजन मुक्ती मोर्चा रायगड जिल्हा स्तरीय आधिवेशन पनवेल मध्ये संपन्न झाले. या अधिवेशनात आंबेडकरी चळवळीतील व विविध पक्षातील नेते मंडळींनी आपली उपस्थिती दर्शिवली व आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणजे भारत राष्ट्र समितीचे पनवेल विधानसभा उप समन्वयक आणि पनवेल महानगर समन्वयक प्राध्यापक प्रफुल भोसले यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रा प्रफुल भोसले यांनी मनोगत व्यक्त करतांना भारत राष्ट्र समिती आणी तेलंगना मुख्यमंत्री के. चन्द्रशेखर राव यांच्या तेलंगाना राज्यातील विकास कामांचा थोडक्यात आढावा देत उपस्थित नागरिकांची मने जिंकली. येणाऱ्या निवडणुकीत भारत राष्ट्र समिती कडून पनवेल विधानसभा व पनवेल महानगर पालिका सर्व 20 विभागात 78 उमेदवार देऊन निवडणुका लढायचे संकेत उपस्थितांना दिले. तसेच पुढिल महिन्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकी साठी गाव पातळी वर भारत राष्ट्र समिती पॅनल स्थापन करुन निवडणूक लढणार असण्याचे संगितले. या कार्यक्रमात अध्यक्ष स्थान अमोल लोंढे यांनी भुषविले तसेच कार्यक्रमाचे उदघाटन रिपब्लिकन नेते नरेंद्र गायकवाड यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी भारत राष्ट्र समिती पालीदेवदचे वार्ड अध्यक्ष कृणाल कदम, बी आर एस पक्षाचे पनवेलचे कार्यकर्ते शशिकांत सातपुते, सतिश कर्डक उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने