भारतीय टपाल विभागातर्फे ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन - नवी मुंबई पोस्टमास्तर गणेश व्ही सावळेकर







भारतीय टपाल विभागातर्फे ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन - नवी मुंबई पोस्टमास्तर गणेश व्ही सावळेकर
पनवेल दि.०९ (संजय कदम) : ग्राहकांना नव्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत आपल्या विविध सेवांबाबत जनजागृती करण्यासाठी भारतीय टपाल विभागातर्फे ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने राष्ट्रीय टपाल सप्ताह उत्सवाचा एक भाग म्हणून नवी मुंबई विभागात आधार शिबिरांसह, निबंधलेखन स्पर्धा, बचत योजनांबाबत जनजागृती तसेच लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती नवी मुंबईचे पोस्टमास्तर गणेश व्ही सावळेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. भारतीय टपाल विभागातर्फे ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी नवी पनवेल येथील मुख्य पोस्ट कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.



                   युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) ची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी जागतिक पोस्टल दिवस साजरा केला जातो. लोकांच्या आणि व्यवसायाच्या जीवनात पोस्टल क्षेत्राच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने जागतिक पोस्टल दिवस साजरा करण्यात येत असतो. भारतीय टपाल विभागातर्फे ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सप्ताहादरम्यान सोमवार ०९ ऑक्टोबर रोजी जागतिक पोस्ट दिन साजरा करण्यात आला तसेच आणि पोस्टल उत्पादनांचा प्रचार करण्यात आला. त्याचप्रमाणे मंगळवार १० ऑक्टोबर रोजी वित्तीया सशक्तिकरण दिवस साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये नाशिक, मालेगाव, पालघर, रायगड आणि पनवेल येथे डाक चौपाल होणार आहे. बुधवार ११ ऑक्टोबर रोजी फिलाटली डे निमित्ताने नाशिक येथे फिलाटली चर्चासत्र/प्रदर्शनचे आयोजन करण्यात येणार आहे. गुरुवार १२ ऑक्टोबर रोजी मेल आणि पार्सल दिवसच्या अनुषंगाने नवी मुंबई, नाशिक विभागांतर्गत मोठ्या प्रमाणातील मेलर्स/निर्यातदारांना अलीकडच्या काळात पोस्ट खात्यात झालेल्या बदल तसेच सुविधांविषयी माहिती देण्यात येणार आहे. तर शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी अंत्योदय दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने आदिवासी भागात आर्थिक जनजागृतीसह आधार शिबिरे आयोजित केली जाणार आहेत




. तसेच इतर विभागांसोबत गरिबांच्या उन्नतीसाठी चर्चासत्र आयोजित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती सुद्धा पोस्टमास्तर गणेश व्ही सावळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचप्रमाणे पुढे माहिती देताना गणेश व्ही सावळेकर यांनी सांगितले कि, नवी मुंबई क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आधार कार्ड शिबीर, शाळांमध्ये ढाई आखर "नवीन भारतासाठी डिजिटल भारत" निबंध स्पर्धा, कुशल आणि अकुशल कामगारांना संस्थात्मक पद्धतीने सामान्य विम्याची विक्री, कॉमन सर्व्हिस सेंटर सेवांची प्रसिद्धी, सामाजिक सुरक्षिततेबद्दल जागरूकता आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, सर्व शिक्षा अभियान, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी इत्यादी लहान बचत योजनांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे अशी माहिती दिली. तर वित्तीय सशक्तिकरण, डाक घर निर्णय केंद्र, वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट यासारख्या मेल आणि पार्सल सेवांवर लक्ष केंद्रित करून इंडिया सिक्युरिटी प्रेस, बँक ऑफ इंडिया, ऍक्सिस बँक आणि इतर किरकोळ विक्रेता यांच्यासोबत अंत्योदयसाठी सेवेचे गुलदस्ता तयार करण्यात आले आहे. पोस्ट ऑफिसच्या बदलत्या भूमिकेचा सेवांच्या वितरणासाठी एक केंद्री म्हणून शेवटचा माइल वापरकर्ता, एमएसएमई आणि कारागीर यांना माहिती देण्यासाठी आणि शिक्षित करण्यासाठी डिझाइन केले असल्याचे पोस्टमास्तर गणेश व्ही सावळेकर यांनी सांगितले.
फोटो : राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्ताने माहिती देताना पोस्ट मास्तर गणेश सावळेकर
थोडे नवीन जरा जुने