पनवेल तालुका पोलिसांनी गणेश विसर्जनावेळी ऑनलाईन होणार्‍या फसवणुकीपासून सावध रहा असे संदेश देणारे फलक लावून केली जनजागृती







पनवेल तालुका पोलिसांनी गणेश विसर्जनावेळी ऑनलाईन होणार्‍या फसवणुकीपासून सावध रहा असे संदेश देणारे फलक लावून केली जनजागृती
पनवेल, दि.1 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील गणेशाचे विसर्जन आज अत्यंत धार्मिकतेने व सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्रितपणे येवून ढोल ताशाच्या गजरात नृत्य करत करण्यात आले. यावेेळी ऑनलाईन होणार्‍या फसवणुकीपासून सावध रहा असे संदेशही जनजागृती फलक लावून यावेेळी देण्यात आले.



सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या सहभागाने वपोेनि अनिल पाटील, वपोनि जगदीश शेलकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात विराजमान झालेेल्या गणेशाची आरती करून शहरातील बल्लाळेश्‍वर मंदिर येथे विसर्जनासाठी मिरवणुक काढण्यात आली. सदर मिरवणूूक काढताना सुद्धा पोलिसांनी प्रथम नागरिकांचा विचार केला. या मिरवणुकीच्या माध्यमातून चांगला संदेश जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्याांनी ऑनलाईन होणार्‍या फसवणुकीपासून सावध रहा असे संदेश देणारे फलक गाड्यांना लावून त्याद्वारे जनजागृती केली. यावेळी या विसर्जनात सर्व पोलीस बांधव मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. गेले 12 दिवस बंदोबस्तामुळे दमलेले, थकलेले पोलीस बांधव या विसर्जनाच्या वेळी मोठ्या उत्साहात सहभागी होवून पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष आपला आनंद द्विगुणीत केला. 


थोडे नवीन जरा जुने