उरण येथील भंगार डेपोच्या अग्नितांडवाला जबाबदार कोण ?








उरण येथील भंगार डेपोच्या अग्नितांडवाला जबाबदार कोण ?


   काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचा सवाल.



उरण दि २९(विठ्ठल ममताबादे )उरण नगर परिषदेच्या हद्दीत बोरीनाका येथे अनधिकृत भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागली होती.सदर आगीत शेजारी असलेले परेश तेरडे यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्याचप्रमाणे बाजूला असलेल्या झोपडपट्टीतील काही घरे जळून खाक झाली आहेत .सदर आग इतकी भीषण होती कि,आग वीझवीण्यासाठी बारा तास अथक प्रयास अग्निशमन टिम ने तसेच सामाजिक संस्था व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले.



 सदर आग संपूर्ण आटोक्यात आणण्यासाठी १२ तासाचा कालावधी लागला.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली. सदर ठिकाणी झालेले नुकसानीचा आढावा घेत नुकसान ग्रस्तांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी म्हणून शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे. सदर पिडीतानां त्वरित भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सदर घटनेचे पीडित परेश तेरडे यांच्याशी चर्चा करून झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला.याप्रसंगी रायगड जिल्हा इंटक अध्यक्ष किरीट पाटील, शहराध्यक्ष प्रकाश पाटील, विधानसभा महिला अध्यक्षा संध्याताई ठाकूर, सदानंद पाटील, दीपक ठाकूर,रेखा धनसरे,वंदना ठाकूर, वंदना म्हात्रे आदी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने