पनवेल दि.०५(संजय कदम):तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावरल गतिरोधक न उभारण्याच्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या भूमिकेबद्दल आज शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यानी संबधित अधिकाऱ्याची भेट घेऊन तीव्र शब्दात संताप व्यक्त केला व येत्या २० ऑक्टोबर २०२३ रोजी जनआंदोलनासह उपोषण करण्याच्या इशारा यावेळी दिला.
यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपाभियंता दिपक बोबडे पाटील यांची शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर, उपतालुका प्रमुख शांताराम कुंभारकर, विभाग प्रमुख दत्ता फडके, उपविभाग प्रमुख विष्णू भोईर आदींसह इतर पदाधिकारी व शिवसैनिकांनी भेट घेऊन तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावरल गतिरोधक न उभारण्याच्या भूमिकेबाबत विचारणा केली. गतिरोधक नसल्यामुळे अपघात वाढले असून नाहक नागरिकांचा जीव जात आहे. या सर्वस्वी जबाबदार महामंडळ असल्याचे सांगितले. या विरोधात येत्या २० ऑक्टोबर २०२३ रोजी जनआंदोलनासह उपोषण करण्याच्या इशारा सुद्धा उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांनी दिला.
Tags
पनवेल