भरधाव ट्रेलरची मोटार सायकलला धडक 1 ठार 1 जखमी





भरधाव ट्रेलरची मोटार सायकलला धडक ; 1 ठार 1 जखमी
पनवेल, दि.7 (संजय कदम) ः भरधाव ट्रेलरने पुढे जाणार्‍या मोटार सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटार सायकलवरील एक जण गंभीररित्या जखमी होवून मयत झाला आहे. तर त्याचा सहकारी जखमी आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.



इर्शाद अली शेख (35 रा.चेंबुुर) हा बजाज डिस्ककव्हर मोटार सायकलवरुन पनवेल येथून जुने पुणे मार्गावरुन डेरवलीकडे जात असताना वैभव पेट्रोल पंपाजवळ कोळखे गाव येथे पंपावर पेट्रोल भरण्यासाठी तो जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रेलरने त्याच्या गाडीस धडक मारल्याने झालेल्या अपघातात इर्शाद अली शेख हा गंभीररित्या जखमी होवून मयत झाला. तर त्याचा सहकारी हिदायत अल्लाह शेख हा जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने