पनवेलमध्ये राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळापनवेलमध्ये राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा
राज्यभरातील 102 शिक्षकांचा शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते आज सन्मान
पनवेेल, दि.7 (वार्ताहर) ः महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने पाचव्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा दि.8 रोजी पनवेल येथे आयोजीत करण्यात आला आहे. या सोहळ्याला शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री दीपक केसरकर आणि महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिति लाभणार आहे.पनवेलचे आमदार प्रशांत ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती नगरपालिका व मनपा शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी दिली. आध्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके सभागृहात होणा-या सोहळ्यात आमदार जयकुमार गोरे, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार रवीशेठ पाटील, आमदार महेश बालदी, आमदार अनिकेत तटकरे, पनवेल आयुक्त गणेश देशमुख ,माजी सभागृह नेते परेश ठाकुर, संतोष भोसले मुबंई शिक्षक उपसंचालक संदिप संगवे,अमित चव्हाण,सिद्धेश पाटेकर उपस्थित राहणार आहेत. आय आय एफ एल गोल्ड लोन फायनान्स कंपनी उद्योजक उमेश भरडा, परेश ठाकुर व प्रकाश बिनेदार यांच्या विशेष सहकार्याने होत असलेल्या सत्कार सोहळ्यात राज्यातील नपा व मनपाचे 102 जणांना सन्मानित करण्यात येणार आहे. राज्य उपाध्यक्षा ज्योत्स्ना भरडा ,मुंबई विभागीय अध्यक्ष वैभव पाटील, रायगड जिल्हा अध्यक्ष प्रमोद लांगी, दशरथ म्हात्रे सुभाष कोल्हे, सरचिटणिस अरुण पवार, सरचिटणीस किशोर पाडवी, महिला आघाडी प्रमुख साधना साळुंखे, कोषाध्यक्ष आनंदराव कोळी आदी शिक्षक संघाचे पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.


थोडे नवीन जरा जुने