उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस(अजित दादा पवार गट )तर्फे आयोजित पदवीधर मतदार संघ नाव नोंदणी शिबीर उत्साहात संपन्न.






उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस(अजित दादा पवार गट )तर्फे आयोजित पदवीधर मतदार संघ नाव नोंदणी शिबीर उत्साहात संपन्न.

 उरण दि. २९ ( विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार व आदेशानुसार पदवीधर मतदार संघातील जास्तीत जास्त पदवी प्राप्त उमेदवारांनी आपले नाव पदवीधर मतदार यादीत नोंदणी करणे महत्त्वाचे आहे.सर्व पदवीधर युवकांचे नाव नोंदणी झालीच पाहिजे तसे आदेश शासनातर्फे देण्यात आले आहेत.महाराष्ट्र शासन यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे. पदवी प्राप्त तरुणांची जास्तीत जास्त नाव नोंदणी व्हावे



. पदवी प्राप्त उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदान करावे. निवडणूक प्रक्रियेत सहभाग घ्यावा या अनुषंगाने उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला असून उरण तालुका राष्ट्रवादि काँग्रेस तर्फे उरण शहरातील एन आय हायस्कूल येथे पदवीधर मतदार संघ मतदारांची नावे नोंदविण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या नावनोंदणी शिबीराचा तरुणांनी पदवीधरांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. सदर नाव नोंदणी प्रसंगी निवडणूक नायब तहसिलदार माधुरी म्हात्रे यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी करून नाव नोंदणी करून घेतले. 




सदर नावनोंदणी शिबीर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ऍड.भार्गव पाटील, रायगड जिल्हा चिटणीस किशोर ठाकूर, उरण तालुकाध्यक्ष परिक्षित ठाकूर,तालुका चिटणीस सनी म्हात्रे,युवक उपाध्यक्ष अमित साहू, तालुका सरचिटणीस दिनेश पाटील, कार्यकर्ते राजू जाधव,सुरेंद्र शिंदे व इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.उत्तम असे नियोजन व आयोजन केल्याने नागरिकांनी, पदवीधर युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.


थोडे नवीन जरा जुने