जेएनपीटिचे कर्मचारी जगदिश भोईर सेवानिवृत्त









जेएनपीटिचे कर्मचारी जगदिश भोईर सेवानिवृत्त


उरण दि 11 (विठ्ठल ममताबादे ) जगदीश काशिनाथ भोईर हे जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण( जेएनपीटी) मध्ये आपली 34 वर्षाची प्रदिर्घ सेवा देवून दि 31/8/2023 रोजी सेवानिवृत्त झाले. या अनुषंगाने रविवार दि. 8/10/2023 रोजी जेएनपीटी टाउनशिप मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित केलेल्या सेवावृित्ती समारंभात विविध कामगार संघटनेचे,सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व जेएनपीटिच्या आजी माजी कर्मचाऱ्यांनी जगदिश काशिनाथ भोईर यांना पुष्पगुच्छ देऊन तसेच आपल्या भाषणातून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.जेएनपीटी विश्वस्त रविंद्र पाटील,माजी विश्वस्त भूषण पाटील,रायगड भूषण प्राध्यापक एल बी पाटील,भारतीय पोर्ट आणि मजदूर महासंघ राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील,जे.एन पी.टी.वर्कर्स युनियनचे मंगेश ठाकूर, प्रकाश नाचरे,गणेश कोळी,दिपक ठाकरे,लुईस डिमेलो 


मोद परब,मोहनदादा भोईर 
आर.डी. पाटील नेरूळ,
माजी उपसरपंच - सारडे गाव श्यामकांत पाटील,दशरथबुवा ठाकूर आदी मान्यवर तसेच विविध कामगार संघटना, संस्थेचे, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. जगदिश भोईर हे सर्वप्रथम बल्क टर्मिनल नंतर कंटेनर टर्मिनल मध्ये कामाला लागले.असिस्टंट टेक्निशियन नंतर त्यांचे टेक्निशियन पदावर प्रमोशन झाले. टेक्निशियन पदावर असताना ते सेवानिवृत्त झाले.जेएनपीटीचे विद्यमान विश्वस्त (ट्रस्टी) रविद्र पाटील यांनी स्थापन केलेल्या जे. एन. पी. टी वर्क्स यूनियनचे ते फाउंडर मेंबर आहेत.





 ही कामगार संघटना स्थापन केल्यापासून ते सचिव पदावर कार्यरत आहेत. अध्यात्मिक सेवेत भजनाच्या माध्यमातून ते बावीस वर्षे जन‌तेला सेवा देत आहेत.दत्त प्रासादिक भजन मंडळ बेलवली पनवेल, जेएनपीटी मित्रपरिवार तसेच प्रसिद्ध पखवाज वादक गुरुवर्य राजारामबुवा सारडेकर यांचे शिष्य पखवाज विशारद कु.निशांत कोळी यांच्या समवेत त्यांची अखंड भजन सेवा सुरु आहे. मनमिळावू, प्रसन्न व्यक्तिमत्व, कामगारांच्या समस्यांची जाण असलेला आदर्श कर्मचारी म्हणून जगदीश भोईर यांची सर्वत्र ओळख आहे. मात्र सेवानिवृत्त झाल्याने अनेकांच्या डोळ्यात यावेळी अश्रू आले.तरीही जड अंतकरणाने सर्वांनी जगदीश भोईर यांना सेवा निवृत्ती बद्दल सत्कार करून पुषगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


थोडे नवीन जरा जुने