उरण दि 12 ( विठ्ठल ममताबादे ) भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री, भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष, कामगार नेते सुरेश कमळाकर पाटील यांच्या मातोश्री विठाबाई कमळाकर पाटील यांचे वयाच्या 83 व्या वर्षी मंगळवार दि 10 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्यावर जासई येथील स्मशान भूमीत अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. मनमिळावू, कुटुंबांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होणाऱ्या विठाबाई यांनी 1984 च्या दिबा पाटील साहेबांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता.
विठाबाई यांच्या जाण्याने पाटील परिवाराचा खूप मोठा आधार हरपला आहे. विठाबाई यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे .विठाबाई पाटील यांच्या पश्चात राजाराम, सुरेश, चंद्रकांत व किशोर ही चार मुले,मुलगी जयवंती , सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. विठाबाई यांचे दशक्रिया विधी गुरुवार दि 19 ऑक्टोबर रोजी नाशिक येथे करण्यात येणार आहे.तर दिवसकार्य दि 22 ऑक्टोबर रोजी जासई उरण येथे राहत्या घरी करण्यात येणार आहे. यावेळी कोणत्याही प्रकारचे दुखवटे विकारले जाणार नाहीत असे पाटील कुटुंबियांनी कळविले आहे.भारतीय मजदूर संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय सचिव, प्रदेशाध्यक्ष यांनी तसेच विविध कामगार क्षेत्रातील कामगार नेत्यांनी, पदाधिकारी यांनी पाटील परिवाराच्या या दुःखद प्रसंगात सामील होत भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली. श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दिबा पाटील जुनिअर कॉलेज जासई तर्फे शिक्षक व विद्यार्थी यांनीही भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.दिवसकार्य दरम्यान जासई येथे विठाबाई यांच्या राहत्या घरी दररोज धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.