करंजाडे मधील अनधिकृत अतिक्रमांविरोधात होणाऱ्या कारवाई संदर्भात जाहीर आवाहन






करंजाडे मधील अनधिकृत अतिक्रमांविरोधात होणाऱ्या कारवाई संदर्भात जाहीर आवाहन
पनवेल दि.०४(संजय कदम): करंजाडे मध्ये होत असलेल्या अतिक्रमनाविरोधात आता करंजाडे ग्रामपंचायत, पनवेल शहर पोलीस ठाणे व सिडको विभागाने एकत्रीत बैठक घेऊन कारवाईसंदर्भात जाहीर आहवन करणारे फलक लावले आहेत. 



       करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, गोपनीय विभागाचे संजय धारेराव, सिडको अधिकरी श्री ठाकूर यांच्या झालेल्या बैठकीमध्ये करंजाडे नोड परिसरातील सर्व हातगाडया, पानटपऱ्या, फेरिवाले, आठवडा बाजार व इतर अनिधिकृत अतिक्रमणे यांचे विरुध सिडको अतिक्रमण विभाग पनवेल शहर पोलिस ठाणे व ग्रामपंचायत यांचे कडून दि. ०१/१०/२०२३ रोजी पासून कारवाई करण्यात येणार आहे तरी संबंधितानी याची नोंद घ्यावी सदर निर्णयाचे पालन करणे सर्वना बंधनकारक राहिल. आपल्या सर्वांची सहकार्याची अपेक्षा आहे. अश्या आशयाचे फलक करंजाडे वसाहत परिसरात लावण्यात आले आहेत. 




थोडे नवीन जरा जुने