पनवेल दि.३०(संजय कदम): शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे अतुल बाळाराम फडके (देवीचापाडा-पनवेल)यांची महाराष्ट्रामध्ये एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण तसेच TSO -सामान्य राज्य सेवा गट-B साठी पात्र ठरल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांचा विशेष सत्कार केला आहे.
यावेळी पनवेल तालुकाप्रमुख विश्वास पेटकर, उपशहर प्रमुख तळोजा हरेश पाटील, विभाग प्रमुख प्रभाग क्र.2 प्रमोद अनंत पाटील, युवासेना विभाग अधिकारी मनोज कुंभारक, युवासेना विभाग अधिकारी जीवन पाटील, उपशाखाप्रमुख तोंडरे वासुदेव पाटील, गट प्रमुख तोंडरे पिंटू पाटील, BLA तोंडरे किरण पाटील, भालचंद्र पाटील, अभिमन्यू धोंडू पाटील, कृष्णा दिनकर पाटील, माणिक पाटील, पत्नी श्रद्धा अतुल फडके, वडील बाळाराम हिराजी फडके, आई पार्वती बाळाराम फडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी अतुल फडके यांच्या पत्नीसह आई वडलांचा विशेष सत्कार करण्यात आला.
Tags
पनवेल