*पनवेल जवळील आदिवासी वाड्यांमध्ये दिवाळी फराळ वाटप*
पनवेल दि.१७(वार्ताहर): सत्कर्म श्रद्धालय, गाडेश्वर, लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम, लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि लायन्स क्लब ऑफ खारघर कोपरा,यांच्या संयुक्त विद्यमाने नेरे च्या पुढील सर्व वाड्यांमध्ये दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये गाडेश्वर,देहरंग,वाघाची वाडी, दोधानी, धामणी,बाबदेववाडी, माळढुंगी, केळीची वाडी टॉवरवाडी येथील सर्व वाडी वस्ती मध्ये राहणाऱ्या सुमारे 1200 कुटुंबातील वनवासी बांधवांना दिवाळी फराळाचे घरोघरी वाटप करण्यात आले.


       सदर फराळात चिवडा, बुंदीचे लाडू, चकली व शंकरपाळे यांचे पॅकेट्स घरोघरी जाऊन वाटण्यात आली.
या उपक्रमात बाराशे पाकीट चे वाटप करण्यात आले. 1200 कुटुंबातील सुमारे 3000 आदिवासी बांधवांनी याचा लाभ घेतला. ला. सुयोग पेंडसे आणि ला. सुरभी पेंडसे यांचे संकल्पनेतून सदर उपक्रम साकार झाला. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी ला. स्वाती गोडसे, ला. एस डी चव्हाण, ला. अशोक गिल्डा, ला. संजय गोडसे, ला. गौतम म्हस्के, ला . प्रेमेद्र बहिरा तसेच सत्कर्म श्रद्धालय चे श्री. बापट आणि सहकारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.


थोडे नवीन जरा जुने