पनवेल दि.०२(संजय कदम): तालुक्यातील ओवळेगावात एका किराणा मालाचे दुकानाचे शटर उचकटून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा १ लाख ७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल २ अज्ञात चोरांनी चोरून नेला होता. या प्रकरणी २ आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.
सुनील दिनकर चव्हाण (वय 19) आणि वंश कालिदास भोरे (वय 21) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तालुक्यातील ओवळे गावात या आरोपींनी अंधाराचा फायदा फिर्यादीच्या किराणा मालाच्या दुकाणाचे लोखंडी शटर उचकटुन आतमध्ये प्रवेश करून ४५ हज रुपये किमतीची सोन्याची अंगठी, ३० हजार रुपये किमतीची बोरमाळ, २००० हजार रुपये रोख आणि ३० हजार रुपये किमतीची पॅशन प्रो मोटार सायकल चोरून नेली होती.
या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोहवा नितीन वाघमारे, पोहवा परेश म्हात्रे, पोना रविंद्र पारधी, पोना विनोद देशमुख, पोशि प्रसाद घरत, पोशि नितीन कांबळे आणि पोशि साईनाथ मोकल यांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले आहे.
Tags
पनवेल