कामोठे मधील एकता सामाजिक संस्थेची आदिवासी पाड्यांवर दिवाळी





कामोठे मधील एकता सामाजिक संस्थेची आदिवासी पाड्यांवर दिवाळी 
आनंद, उत्साह आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या दिवाळीनिमित्त नवीन कपडे, फटाक्यांची आतषबाजी केली जाते. श्रीमंत आणि मध्यम वर्गीयांसाठी ही एक प्रकारची पर्वणीच असते; परंतु घरची आर्थिक परिस्थिती नसलेल्या हा सण साजरा केला जात नाही. सामाजिक बांधिलकीतून पनवेल परिसरातील अनेक सामाजिक संस्था या निमित्ताने पुढाकार घेतात. त्यांच्या वतीने आदिवासी वाड्या-पाड्यांवर तसेच झोपडपट्टी आणि बेघर असणाऱ्या मुलांबरोबर दिवाळीचा सण साजरा केला जात आहे.हिंदू धर्मामध्ये सणांचा राजा असलेल्या दिवाळीनिमित्त घरांमध्ये विद्युत रोषणाई केली जाते. त्याचबरोबर फटाक्यांची आतषबाजी, गोडधोड फराळाचा बेत आखला जातो. नवीन कपडे खरेदी केले जातात. या सणाच्या निमित्ताने आनंदाला पारावार उरत नाही. 




मध्यमवर्गीय तसेच धनदांडग्यांच्या घरी दिवाळीचा सण येतो. मात्र गरीब ,आदिवासी वाडे-पाडे, झोपडपट्टीवासी, त्याचबरोबर उड्डाणपुलाखाली राहणारे बेघर यांच्या आयुष्यात आणि नशिबी आनंदाची दिवाळी फारशी नसते. पोटाची खळगी भरण्यासाठी त्याचबरोबर रोजच्या चटणी-भाकरीसाठी वणवण करणाऱ्या या गरिबांच्या घरीसुद्धा दिवाळीचा सण साजरा व्हावा, या उद्देशाने कामोठे मधील एकता सामाजिक संस्थेच्या वतीने पेण तालुक्यातील उंबरमाळ, केळीची वाडी, काजूची वाडी आणि खऊस वाडी या पाड्यांवरील ११० आदिवासी कुटुंबांना एक किलो रवा, एक किलो मैदा, एक किलो साखर, एक लिटर गोडेतेल, अर्धा किलो डालडा आणि लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.




यावेळी एकता सामाजिक संस्थेचे अमोल शितोळे, डॉ. मनोजकुमार शेट्ये, महेश चव्हाण, देवेंद्र उकळी, सूरज गोविलकर, गणेश चौकेकर, हरीश बाबरिया, शितल शितोळे, श्रद्धा लुडबे उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अजित चोकेकर, आई भवानी मित्र मंडळ, सेक्टर 12 कामोठे, नारायण गोरे, उमेश नाईक, विठ्ठल इप्ते, उषा डुकरे, उमेश गायकवाड, संगीता काका पवार, पंकज ननावरे, नामदेव चौकेकर, रवींद्र जाधव, शिवांश बिटला, मयुरेश बंडकर, सत्यवान वारिक, सुरेखा शेट्टी, रेखा शेट्टी, प्रसाद तेली, दीपा राजेंद्र खरात, शेखर जगताप, जयेश्री झा, निलेश खावडे, अमोल गोडसे, राहुल बजाज, विशाखा मोरे, मेघा हजारे, राजेंद्र परब, आरती सहाने, त्रूनाली शहा, संपत शेट्टी, हिरा भट, रिधेश शेलार, योगेश चव्हाण, साईनाथ खानोलकर, श्रद्धा सावंत, परेश चव्हाण, महेश कदम, प्रसाद शेट्ये, दीप्ती खंडेवाल आदींनी भरीव योगदान दिले.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, बाळग्राम तसेच ग्राम संवर्धन सामाजिक संस्थाचे सदस्य यांनी सदर पाड्यांवरील आदिवासीं बरोबर संपर्क करून मोलाचे सहकार्य केले.


थोडे नवीन जरा जुने