बिग बास्केट कंपनीमार्फत पनवेल परिसरात करण्यात येणार दूध पूरवठा तात्काळ बंद करावा - पनवेल मिल्क फेडरेशन अध्यक्ष रमेश गुडेकर






बिग बास्केट कंपनीमार्फत पनवेल परिसरात करण्यात येणार दूध पूरवठा तात्काळ बंद करावा - पनवेल मिल्क फेडरेशन अध्यक्ष रमेश गुडेकर
पनवेल दि.०४(संजय कदम): बिग बास्केट कंपनीमार्फत पनवेल परिसरात करण्यात येणार दूध पूरवठा तात्काळ बंद करावा अशा मागणीचे निवेदन पनवेल मिल्क फेडरेशन अध्यक्ष रमेश गुडेकर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची भेट घेऊन दिले आहे. 




       या निवेदनात रमेश गुडेकर यांनी म्हंटले आहे की, सर्व दुध विक्रेते पनवेल मिल्क फेडरेशनचे सदस्य असून पनवेल शहर आणि ग्रामीण भागात दुध पुरवठा करण्याचे काम करीत आहेत. साधारण ५० ते ६० जण सदस्य आहेत व ते सर्वजण स्थानिक रहिवासी प्रकल्पग्रस्त असून सदरच्या कामामुळे त्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. परंतु ते ज्या भागामध्ये दूध पुरवठा करत आहेत तेथे बिग बास्केट या कंपनीच्या लोकांनी येवून दूध पुरवठा करण्याचे काम सुरू केले आहे. ते आम्ही बंद करणार आहोत याची नोंद पोलिस खात्याने घेवून याबाबतीत आपण आम्हांस सहकार्य करावे तसेच सर्व दुध विक्रेते पनवेल मिल्क फेडरेशनचे सदस्य असून शहर व ग्रामीण भागातील भुमीपुत्र प्रकल्पग्रस्त असून तरुण वर्ग आपआपल्या परिने कामधंदा करीत आहोत गेली अनेक वर्षे सुखसमाधानाने हातात हात घालून त्यांचा धंदा इमाने इतबारे करीत आहेत. आतापर्यंत शांततेने काहीही भांडण तंटा न करता एकोप्याने सर्व तरुण सदरचा धंदा करीत आहेत




. परंतू आज बाहेरिल कंपन्या उदा. बिग बास्केट सारख्या कंपन्या आमच्या तरुणांच्या पोटापाण्याच्या उदयोगावर अतिक्रमण करीत आहेत. परस्पर आमच्या भागामध्ये दूध पुरवठा करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना सदर धंदा करता येत नाही. पुष्कळ वेळा आम्ही कंपनीच्या बरोबर तडजोड करण्याचा प्रयत्न केला तरीपण ते आजपर्यंत दादागिरीने दमदाटी करून "तुम्ही आमचे काहीही वाकडे करू शकत नहीं, आम्ही आमच्या पध्दतीने दुध टाकून धंदा करू" अशी अरेरावीची भाषा वापरत आहेत. त्यामुळे आम्ही स्थानिक प्रकल्पग्रस्त तरुण वर्ग जो बराव बेरोजगार आहे परंतू सदर धंदा करून आपले पोट भरत आहोत एकत्र येवून त्यांची अरेरावी बंद करून सदर त्यांचे दूध टाकण्याचे काम बंद करणार आहोत. तरी यासाठी स्थानिक भूमीपुत्र प्रकल्पात बेरोजगार तरुणांना योग्य ते सहकार्य करावे असे या निवेदत अधोरेखित करण्यात आले आहे. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती कारवाई करण्यकये आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिले आहे.


थोडे नवीन जरा जुने