३०० कोटीहून अधिक बेनामी रोकड; पनवेलमध्ये काँग्रेस खासदाराचा निषेध

                   


पनवेल: दि.१२ डिसेंबर (4K News) काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या घरातून आयकर विभागाने ३०० कोटींहून अधिकची रोकड जप्त केली आहेभ्रष्टाचाराचा अड्डा बनलेल्या काँग्रेसचा आता खरा चेहरा समोर येत आहे२जी घोटाळाबोफोर्स घोटाळ्या सारखे अनेक घोटाळे काँग्रेसच्या राजवटीत झालेतदेशाला पार लुटूनओरबाडून कोट्यवधींची माया जमवली यातीलच एक राहुल गांधींचे अत्यंत निकटवर्ती खासदार धीरज साहू यांच्या घरावर नुकताच आयकर विभागाकडून धाड टाकून बेनामी रोकड जप्त करण्यात आली


 त्या अनुषंगाने देशभरात मोठी खळबळ उडाली असून काँग्रेसच्या गोटात चिंता पसरली आहेआणि या सर्व बाबतीत कॉग्रेस मूग गिळून गप्प बसली आहेत्यामुळे याचा पनवेलमध्ये महिला मोर्चाच्यावतीने आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला
          पनवेल भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन जयराम पाटीलजिल्हा सरचिटणीस चारुशीला घरतशहर अध्यक्ष अनिल भगतशहर सरचिटणीस अमित ओझेमाजी उपनगराध्यक्ष मदन कोळीमाजी नगरसेवक बबन मुकादममाजी नगरसेविका नीता माळीपनवेल ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्षा नीता चोणकरमहिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस ऍड वृषाली वाघमारेमहिला मोर्चा जिल्हा चिटणीस शिल्पा म्हात्रे,  कामगारानेते जितेंद्र घरतके.सी.पाटीलसोशल मीडिया शहर संयोजक प्रसाद हनुमंतेविनायक मुंबईकरशहर चिटणीस रुपेश नागवेकर,रामा मुरबाळेसुहासिनी केकानेप्रभाग १८ चे अध्यक्ष महेश सरदेसाईराजा चव्हाणसागर मंगवानीसनी बागडी,अंजली इनामदार, आरती तायडे, नंदा टापरेजरीना शेखअनिता जाधवविश्वश्री जाधव उपस्थित होते.         काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरातून आयकर विभागाने ३०० कोटींहून अधिकची रोकड जप्त केली आहे.विशेष म्हणजे धाड टाकणाऱ्या पोलिसांनाही रोकड मोजण्यासाठी मशीन मागवाव्या लागल्या.  प्रचंड प्रमाणात झालेल्या आणखी एक घोटाळ्याविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला.  विशेष म्हणजे  १२ ऑगस्ट २०२२ रोजी सामाजिक माध्यमांवर 'नोटबंदी के बाद भी देश मे इतना काला धन ओर भ्रष्टाचार देखकार मन व्यथित हो जाता हैमेरी तो समझ मे नही आता की कहा से लोग इतना काला धन जमा कर लेते है?' असे ट्विट करून 'देशातील भ्रष्टाचार कोणी खत्म करेल ती काँग्रेसच करेलअसे स्वतःच भ्रष्ट्राचाराने बरबटलेल्या खासदार धीरज साहू यांनी वक्तव्य केले होतेमात्र ते विधान जनतेची दिशाभूल आणि स्वतःची पाठ थोपटण्यासाठी केले असल्याचे या निमिताने स्पष्ट झाले आहे 


थोडे नवीन जरा जुने