स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन व मोफत अन्नदानाचे वाटप

  

 पनवेल: दि. ७ डिसेंबर (4K News) : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्यरात्री पनवेल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले.त्यानंतर ते आपल्या कार्यकर्त्यांसमवेत दादर चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गेले.
        स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत मनोज भाई संसारे यांच्या प्रेरणेतून गेली 34 वर्ष येणाऱ्या लाखो भीम भक्तांना पक्षाच्या वतीने मोफत अन्नदान करण्यात येत आहे. इतर कोणताही आंबेडकरी चळवळीच्या पक्षापेक्षा हे अन्नदानाचे कार्य गेली 34 वर्ष अविरतपणे चालू आहे. त्याचबरोबर पक्षाच्या वतीने मीनाताई ठाकरे यांच्या स्मारकाशेजारी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर भाई संसारे, अनिकेत संसारे, महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव अशोक वाघमारे, मुंबई प्रदेशचे अध्यक्ष अमित हिरवे, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख अरुण धिवर, मुंबई प्रदेश युवा अध्यक्ष सिद्धार्थ पेडणेकर, रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष विजय धोत्रे, पेण तालुका अध्यक्ष अमित कांबळे, समाधान कांबळे, भारत दाताड या मान्यवरांनी या अभिवादन सभेमध्ये सहभाग घेतला होता 

.त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने येणाऱ्या लाखो भीम भक्तांचे अतिशय उत्कृष्ट सोय केल्याबद्दल सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व सर्व मंत्रिमंडळ त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त त्यांचे सर्व कर्मचारी यांना पक्षाच्या वतीने धन्यवाद देण्यात येत आह
थोडे नवीन जरा जुने