कळंबोली अग्निशमन केंद्रामध्ये प्राणिक हीलिंग थेरेपी वर माहिती व प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न






कळंबोली अग्निशमन केंद्रामध्ये प्राणिक हीलिंग थेरेपी वर माहिती व प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न
कळंबोली अग्निशमन केंद्रामध्ये प्राणिक हीलिंग थेरेपी वर माहिती व प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न 
  पनवेल दि ०७ (वार्ताहर) : कळंबोली अग्निशमन केंद्रामध्ये प्राणिक हीलिंग थेरेपी वर माहिती व प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न झाला 
                       प्राणिक हीलिंग थेरेपी मध्ये भाजणे, कापणे विविध शारीरिक व मानसिक आजार तसेच लहान मुलांसाठी त्यांचे अभ्यासातील लक्ष केंद्रित करणे, मोबाईल अडिक्शन घालवणे, तसेच अती ताण पडल्यामुळे होणारे त्रास इत्यादी वर महत्वाचे म्हणजे fire service मध्ये असताना स्वतः कर्मचारी किंवा त्याच्या संपर्कातील, कुटुंबातील व्यक्तींसाठी उपयोगी असणारी माहिती देण्यात आली. या प्रसंगी कर्मचारी आणि कर्मचारी कुटुंबातील सदस्य तसेच लहान मुलांनी सदर कार्यक्रमातून मिळणाऱ्या माहितीचा लाभ घेतला. 



तसेच उपस्थित अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कौटुंबिक सदस्यांनी देखील healing चा प्रत्यक्ष अनुभव घेतला. Twin हार्ट मेडीटेशन अर्थात दविह्रदय ध्यान करून एक सुंदर अनुभव घेतला. हा कार्यक्रम मधुरता फाउंडेशन व मैत्रेय प्राणिक हिलिंग सेंटर पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. यात मुख्यत: श्वेतिका मोरे यांनी संपूर्ण नियोजन केले. मधुरता फाउंडेशन च्या बिनिता शर्मा, शैलेंद्र हनुमंते , मैत्रेय प्राणिक हिलिंग सेंटरच्या मेघना कदम, सई कुळकर्णी यांनी या कार्यक्रमात प्रमुख सहभाग घेतला. स्टेशन ऑफिसर सौरभ पाटील व सब ऑफिसर दिलीप पाटील यांनी अशाप्रकारचा कर्मचाऱ्यांच्या हिताचा कार्यक्रम करून एक चांगला पायंडा पाडला आहे. तर मयूर भोईर यांनी या सर्व नियोजनात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
 
थोडे नवीन जरा जुने