पनवेल रेल्वे सटेशन परिसरात वाढत्या लुटमारीच्या घटनांमुळे प्रवासीवर्ग त्रस्त






पनवेल दि.११(संजय कदम): पनवेल रेल्वे सटेशन परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या लुटमारीच्या घटनांमुळे प्रवासीवर्ग त्रस्त झाला असून याठिकाणी पनवेल शहर पोलिसांसह रेल्वे पोलिसांनी आपली गस्त वाढवून कारवाई करावी अशी मागणी प्रवासीवर्गामधून होत आहे.  




            पनवेल स्टेशन वरून येताना जो मधला रस्ता स्टँड ला जाणारा पाण्याच्या टाकी जवळचा आहे तिथून रात्रीच्या वेळेस जाणे अश्यक्यप्राय बनले आहे. कारण अनेक वेळा त्याठिकाणावरून ये जा करणाऱ्या प्रवाश्यांना लुटण्याचे, मोबाईल काढण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. त्याचप्रमाणे सर्कलच्या डाव्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात तसेच रस्त्यावर परप्रांतीयांनी बेकायदेशीररीत्या वास्तव्य केले असून त्याठिकाणी सुद्धा काळोखाचा फायदा घेत तेथून जे-जा करणाऱ्या नागरिकांना लुटण्याचे व मारहाणीचे प्रकार वाढले आहेत.



 रेल्वे स्टेशन परिसरात असलेले भिकारी, गर्दुल्ले, नशा करणारे तरुण मोठ्या प्रमाणात रात्रीच्यावेळी याठिकाणी घुटमळत असतात व ते मोबाईल खेचून पळ काढतात अश्या अनेक तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी महिला वर्गाला ये-जा करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. तरी पोलीस खात्याने याकडे लक्ष घालून तातडीने करावी करावी अशी मागणी प्रवासीवर्गाकडून करण्यात येत आहे. 



थोडे नवीन जरा जुने