पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी विवेक पाटील यांची निवड





सरचिटणीसपदी हरेश साठे, उपाध्यक्षपदी संजय कदम तर खजिनदारपदी नितीन कोळी  
पनवेल दि.११ (वार्ताहर) : पत्रकारिता क्षेत्रासोबत सातत्याने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या पनवेल तालुका विकास मंचच्या अध्यक्षपदी विवेक मोरेश्वर पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.


            पनवेल तालुका पत्रकार विकास मंचची वार्षिक सर्वसाधारण बैठक पत्रकार दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडली. यावेळी सन २०२४ सालाकरिता कार्यकारिणीची बिनविरोध निवड जाहीर झाली. त्यानुसार ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, अविनाश कोळी आणि संजय सोनावणे सल्लागार असणार आहेत. सरचिटणीसपदी हरेश साठे, उपाध्यक्षपदी संजय कदम, खजिनदारपदी नितीन कोळी, ,कार्यकारिणी सदस्य म्हणून मंदार दोंदे, राजेंद्र पाटील, प्रविण मोहोकर, राजू गाडे, दीपक घोसाळकर, तृप्ती पालकर, भरतकुमार कांबळे हे जबाबदारी पार पडणार आहेत. 





पनवेल तालुका पत्रकार विकास मंच गेल्या अठरा वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून फक्त पत्रकारिता नाही तर शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करीत आहे.दरवर्षी विविध शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याबरोबरच शाळांना डिटीजल करण्याच्या दृष्टीने प्रोजेक्टर संच देण्याचे महत्वपूर्ण काम झाले आहे. कुष्ठरुग्णांसोबत दिवाळी साजरी करणे, कर्तृत्वान महिलांचा सत्कार, मातृभाषा दिन, ब्लॅंकेटचे वाटप, अशी व इतर उपक्रमे वर्षभरात होत असतात.


थोडे नवीन जरा जुने