बंद फार्महाऊसवर चोरी करण्याचा प्रयत्न असफलपनवेल दि.१२(वार्ताहर): उसर्ली-शिवकर गावातील एका फार्म हाऊसवर काही अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॉमेरामध्ये कैद झाला आहे. दरम्यान या संदर्भात सर्वांनी सतर्क राहण्याच्या सूचना पनवेल शहर पोलिसांनी दिल्या आहेत.            पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील उसर्ली-शिवकर गावातील राकेश जैन यांच्या फार्महाऊस वर काही अज्ञात चोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॉमेरामध्ये कैद झाला आहे. त्यामुळे एकांतात असणारे बंगले, फार्म हाऊसवरील सुरक्षा रक्षक आणि ग्रामस्थांनी सतर्क राहण्याच्या सूचना पनवेल शहर पोलिसांनी दिल्या आहेत. तसेच *नागरीकांच्या सुरक्षेसाठी *पोलिसांकडून योग्य ती पोलीस गस्त ठेवण्यात येणार असून नाकाबंदीचे देखील आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिल्या आहेत.


थोडे नवीन जरा जुने