हायवे ब्रेक हॉटेलला भीषण आग




पनवेल दि.१२ (वार्ताहर): खारघर मध्ये मध्यरात्री हायवे ब्रेक हॉटेलला भीषण आग लागली असून त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 
            खारघर शहरातील नेहमी गजबजलेले असलेले सेक्टर 10 परिसरातील हायवे ब्रेक हॉटेलला आग लागली रात्रीच्या सुमारास सर्व काम आटपून कामगार हॉटेल बंद करून घरी गेले होते. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास या हॉटेलला अचानक आग लागली.


 या लागलेल्या आगीत हॉटेलमधील फ्रिज खाण्याचे साहित्य टेबल खुर्च्या त्यांच्यासह स्वयंपाक तयार करण्याचे भांडी आधी साहित्य आगीत जळून खाक झाल्याचे दिसून आले. हॉटेलमधील लाखो रुपयांच्या साहित्याच्या नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आग कशामुळे लागली हे अद्याप निष्पन्न झाले नाही. त्या आगीमध्ये हायवे ब्रेक हॉटेल जळून खाक झाले आहे. हॉटेलला मध्यरात्री आग लागली या आगीची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवले. आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या आगीमध्ये हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे.


थोडे नवीन जरा जुने