दिशा महिला मंचाच्या वतीने हळदीकुंकू समारंभ; विधवा महिला व एल.जी.बी.टी यांचा देण्यात आला मान







पनवेल दि.०९ (वार्ताहर): दिशा महिला मंच आयोजित हळदीकुंकू चा थाट खास 'ती' च्या साठी या उपक्रमाचे आयोजन कामोठे येथील आगरी हॉल या ठिकाणी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमीप्रमाणेच हळदी कुंकू ची सुरुवात विधवा महिला व एल.जी.बी.टी यांना हळदी कुंकवाचा मान देऊन करण्यात आली.



             पूर्वापार चालत आलेल्या त्या रुढीला बाजूला सारून सर्वसामान्य स्त्री प्रमाणे तिलाही समाजात तोच मानसन्मान मिळावा हीच भावना ठेऊन हळदी कुंकू चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजसेविका इंदू झा मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. कामोठे येथील साई द्वारका क्लिनिक व नर्सिंग होम चे डॉ. हेमंत पाटील सर,कांचनमाला इन्फ्रा कंपनीच्या डॉ शर्वरी पाटणे, जयदादा डिगोळे व बायहार्ट पाथ लॅबचे डॉ.तान्हाजी डेरे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन यावेळी दिशा व्यासपीठाला मिळाले. लॅब कडून या समारंभात आरोग्यशिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. पतीच्या निधनानंतर महिलेला कुंकू लावण्यास बंदी घालणं कितपत योग्य आहे. दुखा:चा डोंगर डोक्यावर कोसळलेल्या असतानाही शेती, उद्योगधंदे, घरं चालवणे, मुलांचं शिक्षण या सर्व जबाबदाऱ्या महिला आपलं कर्तव्य समजून पार पाडतात.




 तरीही अशा महिलांना समाजात अशा समारंभात बाजूला सारलं जात म्हणूनच हा पायंडा आम्ही 2020 पासून मोडीत काढत आलेलो आहोत हा हळदी कुंकवाचा हा थाट खास त्यांच्यासाठीच असतो असे यावेळी दिशा संस्थापक सौ. निलम आंधळे म्हणाल्या. कुंकवाचा धनी परलोकवासी झाल्यानंतर घरीदारी उपेक्षेची नजर वाट्याला आलेल्या महिलांच्या कपाळी हळदी-कुंकवाची बोटं लागली आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले एकमेकींना आलिंगन देऊन निःशब्द भावना नजरेतून यावेळी व्यक्त झाल्या यावेळी एल.जी.बी.टी विकास यांचाही मान सन्मान करण्यात आला. 



आपल्यातीलच एक असलेल्या या व्यक्तिमत्वास सर्वांनी स्वीकारावं त्यांच्याबद्दल असलेले गैरसमज दूर व्हावेत त्यांनाही तेवढाच मान सन्मान मिळावा या उद्देशाने त्यांनाही या समारंभात व्यक्त होण्याची संधी मिळाली व या समारंभाचे भावनिक दृश्य यावेळी पाहायला मिळाला. यावेळी महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.लावणीच्या तालावर महिलांनी काही परफॉर्मन्स देखील केले व इतर महिलांनाही थिरकायला भाग पाडले.आरती चव्हाण मॅडम यांनी धमाल, मजेशीर, विविध खेळ खेळत बक्षीसांची लयलूट करत मोठ्या जल्लोषात समारंभ पार पडला. यावेळी दिशा व्यासपीठाच्या उपाध्यक्ष विद्या मोहिते यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळत सर्व महिलांच्या पाठीशी कणखरपणे उभे आहोत असे म्हणाल्या व आतापर्यंत च्या व्यासपीठातील काही आठवणी ताज्या करत त्या गहिवरून गेल्या



. या हळदी कुंकू समारंभास कामोठे व परिसरातील महिला मान्यवरांची देखील प्रमुख उपस्थिती लाभली.या समारंभास रेखा ठाकूर,विभावरी शिगवन, सुनीता सुळे, शोभा सपकाळ मंदाकिनी पाटील,ज्योती बोबडे,करुणा कांबळे जयश्री वाघमारे,वंदना पोपळकर,राजश्री थोरात 
ज्योती घोलप,शलाका डोके,ज्योती रायबोले, वंदना वाघमोडे, दिक्षा ढोणे सख्यांच्या सहकार्यामुळे समारंभ यशस्वीरित्या पार पडला.


थोडे नवीन जरा जुने