रस्त्यावर बेकायदा बर्फ विक्री करणारा इमरान बर्फवाला मुळे पनवेलकरांचे आरोग्य धोक्यात: महानगरपालिकेचे दुर्लक्ष्य*


पनवेल दि.१८(वार्ताहर):  पनवेल महानगर पालिका जवळील जलालशहा बाबा दर्ग्याच्या बाजूला बेकायदेशीर रित्या इमरान बर्फ वाला हा रत्यावरच बर्फ ठेवून त्याची विक्री वेगवेगळ्या सरबताच्या गाड्यांना, उसाच्या रस गुरळांना ज्यूस सेंटर यांना दूषित पाण्यापासून बनवलेला व रस्त्यावर ठेवलेला बर्फ दिला जात असल्याने ऐन उन्हाळाच्या दिवसात पनवेलकरांचे आरोग्य धोक्यात आले असून या गोष्टीकडे पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य खाते व अतिक्रमण विभाग दुर्लक्ष्य करत असल्याने पनवेलकरांनी संपताप व्यक्त केला आहे.           येथील जलालशहा बाबा दर्ग्याजवळ सदर इमरान बर्फ वाला हा रस्त्यावरच प्लास्टिक किंवा कापडा मध्ये बर्फ गुंडाळून विक्री करत आहे. उभा उघड्यावरच्या बर्फामुळे अनेक जीवजंतू पसरले जात आहेत. या बर्फाचे सेवन किंवा वापर केल्याने आरोग्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून रोगराई वाढीस लागल्याचे प्रमुख कारण हा बर्फ बनत चालला असतानाही पनवेल महानगरपालिका प्रशासन या गोष्टीकडे का कानाडोळा करत आहे असा सवाल विचारला जात असून तातडीने हा बर्फ वाल्याला इथून हलवण्याची मागणी पनवेलकर करत आहेत. 


थोडे नवीन जरा जुने