पनवेल दि.१३ (वार्ताहर): केएलई कॉलेज ऑफ लॉ, कळंबोली येथे 16 मार्च ते 17 मार्च दरम्यान स्पार्कल 5.0 नॅशनल मूट कोर्ट कॉम्पिटिशन आणि नॅशनल क्लाइन्ट कौन्सिलिंग कॉम्पेटिशनचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश हजर राहणार आहेत.
राष्ट्रीय स्तरावरची ही कॉम्पिटिशन आहे. नॅशनल मूट कोर्ट कॉम्पिटिशन आणि क्लाइन्ट कौन्सिलिंग कॉम्पेटिशनसाठी संपूर्ण भारतातून 50 हून अधिक टीम येणार आहेत.
देशभरातून जम्मू काश्मीर, गोवा, दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, पंजाब, मध्य प्रदेश, त्रिपुरा, हैदराबाद येथून येणार असल्याची माहिती प्राचार्य दिनकर गीते यांनी दिली. 17 मार्च रोजी मूट कॉम्पिटिशन, क्लाइन्ट कौन्सिलिंग कॉम्पेटिशन होणार आहे. यावेळी विजेत्यांना पारितोषिक आणि ट्रॉफी देण्यात येणार आहेत.17 मार्च रोजी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश प्रसन्न वरळे, मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश नितीन आर बोरकर, कुलपती प्रोफेसर वेंकटराव, मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश ए के मेनन, केएलई सोसायटीचे चेअरमन प्रभाकर कोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. दिनकर गीते यांनी दिली. यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
Tags
पनवेल