पनवेल दि.१९ (वार्ताहर): शिवसेना पनवेल तालुका प्रमुख ग्रामीण क्षेत्र उरण विधानसभा पदी बाळाराम उर्फ बाळासाहेब कृष्णा नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील नियुक्तीपत्र मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरित होऊन व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळाराम उर्फ बाळासाहेब कृष्णा नाईक यांची शिवसेना पनवेल तालुका प्रमुख ग्रामीण क्षेत्र उरण विधानसभा पदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे नियुक्तीपत्र मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर, रामदास शेवाळे, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख महिला सेवा कार्यक्षेत्र उरण मेधा दमडे, शिवसेना पनवेल तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे यांच्या शिफारसी नुसार हि नियुक्ती करण्यात अली असून यावेळी ओवळे ग्रामपंचायत उपसरपंच निलेश गायकवाड, माजी उपसरपंच मनोज दळवी उपस्थित होते. यावेळी शुभेच्छा देताना श्रीरंग बारणे यांनी सांगिलते की, शिवसेना युवासेना पक्षाच्या ध्येय धोरणानुसार वाटचाल कराल व शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील राहाल, हि अपेक्षा अश्या शुभेच्छा दिल्या.
Tags
पनवेल