पनवेल दि.०१(वार्ताहर): स्व.प्रतिक जयंत भोईर याच्या स्मरणार्थ प्रतिक जयंत भोईर मेमोरियल फाउंडेशन व मे. सुरज इंटरप्राईजेस पळस्पे तसेच डॉ.जयंत अर्जुन भोईर व पळस्पे ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रकांत अर्जुन भोईर यांच्याकडून पनवेल तालुक्यातील पळस्पे ग्रामपंचायतीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे.
या समारंभ प्रसंगी डॉ.जयंत भोईर व पळस्पे ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रकांत भोईर यांच्याबरोबर भोईर कुटुंबीय, पळस्पे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पळस्पेतील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे ढोल,ताशा पथक, भव्य लाईट शो,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Tags
पनवेल